JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / जेव्हा 'मॅडम'वर कारवाईसाठी चौथीच्या विद्यार्थिनी पोहोचल्या पोलीस ठाण्यात..., नेमकं काय आहे प्रकरण?

जेव्हा 'मॅडम'वर कारवाईसाठी चौथीच्या विद्यार्थिनी पोहोचल्या पोलीस ठाण्यात..., नेमकं काय आहे प्रकरण?

चौथीच्या मुलींनी पालकांसह थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनूप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 28 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक शाळेतील मुलांना शाळेतील शिक्षिकेने मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक शाळेतील मुलांना शाळेतील शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना थेट पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. छत्तीसगड राज्यातील कोरबा जिल्ह्यात हा प्रकार समोर आला आहे. शिक्षिकेच्या अशा वागणुकीमुळे संपूर्ण गावात संताप व्यक्त होत आहे. पोलीस या शिक्षिकेवर कारवाई करणार आहेत. पीडित विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. लवकरच याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच गरज पडल्यास शिक्षिकेला अटकही केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बारावीच्या विद्यार्थिनीला वेगळ्या रुममध्ये बोलवलं अन्…., 35 वर्षाच्या शिक्षकांचं संतापजनक कृत्य गावातील गोधी येथील शासकीय प्राथमिक शाळेत शिक्षिका अनुपमा मिंज यांनी दोन विद्यार्थिनींना बेदम मारहाण केली होती. याबाबतची माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांनी दोन्ही मुलींना घेऊन सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच शिक्षिकेवर संबंधितांनी तक्रार करून कारवाईची मागणी केली. वैद्यकीय तपासणीत मारहाणीची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी या शिक्षिकेविरुद्ध तपास सुरू केला आहे. तपासानंतर शिक्षिकेला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षेच्या नावाखाली शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधीही विद्यार्थ्यांसोबत मारहाणीचे प्रकार समोर आले आहेत. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाईही केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या