JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / महिला मानवी मांस आणि रक्तापासून बनवायची केक, शेजाऱ्यांनाही खाऊ घातले, असा झाला खुलासा

महिला मानवी मांस आणि रक्तापासून बनवायची केक, शेजाऱ्यांनाही खाऊ घातले, असा झाला खुलासा

लिनार्डाने दुसरी हत्या 1940 मध्ये फ्रान्सेस्का सोएवी नावाच्या महिलेची केली. लिनार्डाने तिला नोकरीच्या बहाण्याने फसवलं. मागील वेळीप्रमाणेच तिने महिलेची हत्या करून केक बनवला आणि सगळे पैसेही चोरी केले

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 14 फेब्रुवारी : नरभक्षक लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आपण किती धोकादायक व्यक्तीसोबत जीवन जगत आहोत याची अजिबात कल्पनाही नसते. सध्या अशाच एका नरभक्षक महिलेचं थरकाप उ़डवणारं कृत्य समोर आलं आहे. ही महिला आपल्या शेजाऱ्यांना हाताने बनवलेला केक खाण्यासाठी देत असे (Serial Killer Baked a Cake by Blood of Woman). मात्र शेजाऱ्यांना याची कल्पनाही नव्हती की ते किती भयंकर अपराधात भागीदार बनले आहेत. लिनार्डा सियानसिलू असं या महिलेचं नाव असून तिला मानवांची हत्या करण्याची आवड होती. या गुन्ह्यासाठी ती अनेकदा आयुष्यात आनंदी नसलेल्या किंवा त्रासलेल्या महिलांना टार्गेट करायची. इटलीच्या या पहिल्या महिला सिरीयल किलरने हे सिद्ध केलं की गुन्हेगाराचं जेंडर कोणतंही असलं तरी फरक पडत नाही, कारण प्रत्येक गुन्हेगाराच्या मनात क्रूरता भरलेली असते. या महिलेने 3 खून केल्यानंतर मृतदेहांचं काय केलं हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. माथेफिरू प्रियकराचं धक्कादायक कृत्य; प्रेयसीवर अॅसिड फेकण्यासाठी 640 किमी प्रवास डेली स्टारच्या वृत्तानुसार, लिनार्डाची केस “द सोप-मेकर ऑफ कोरेगिओ” म्हणून प्रसिद्ध झाली. या महिलेचा पहिला बळी ठरली ती फोत्सिना सेट्टी नावाची महिला. 1939 मध्ये लिनार्डाने तिला आपल्या घरी बोलावलं आणि एक चांगला नवरा मिळवून देण्याचं वचन दिलं. तिच्याकडून पत्र लिहून घेतलं की ती एका मुलाला भेटण्यासाठी देशाबाहेर गेली आहे, त्यानंतर कुऱ्हाडीने तिची हत्या केली आणि तिच्या शरीराचे 9 तुकडे केले. हे तुकडे लिनार्डाने कॉस्टिक सोडा टाकून साबण बनवण्यासाठी उकळले, तर रक्त एका भांड्यात गोळा करून ओव्हनमध्ये सुकण्यासाठी ठेवलं. सुकल्यानंतर पीठ, साखर, चॉकलेट, अंडी आणि दुधासोबत हे रक्त मिसळून त्याचे टी केक्स बनवले. हे केक ती आपल्या घरी येणाऱ्या लोकांना खाऊ घालत असे. खुनाच्या गुन्ह्याचा पश्चाताप,जेलमध्ये उचलले भयावह पाऊल, कैदीही हादरले लिनार्डाने दुसरी हत्या 1940 मध्ये फ्रान्सेस्का सोएवी नावाच्या महिलेची केली. लिनार्डाने तिला नोकरीच्या बहाण्याने फसवलं. मागील वेळीप्रमाणेच तिने महिलेची हत्या करून केक बनवला आणि सगळे पैसेही चोरी केले. याचवर्षी तिने आणखी एका महिलेला नोकरीच्या बहाण्याने फसवलं आणि घरी बोलवून तिची हत्या केली. तिचाही केक आणि साबण बनवून शेजाऱ्यांना वाटला. मात्र यावेळी खुलासा झालाच. ज्या महिलेला तिने मारलं होतं, तिच्या चिठ्ठीवर घरच्यांना विश्वास बसला नाही आणि नरभक्षक लिनार्डा पोलिसांच्या तावडीत सापडली. तिने आपला गुन्हा मान्य केला आणि तिला ३० वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही झाली. ऑक्टोबर 1970 मध्ये वयाच्या 79 व्या वर्षी तिथेच तिचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या