जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / माथेफिरू प्रियकराचं धक्कादायक कृत्य; प्रेयसीवर अॅसिड फेकण्यासाठी 640 किलोमीटरचा प्रवास

माथेफिरू प्रियकराचं धक्कादायक कृत्य; प्रेयसीवर अॅसिड फेकण्यासाठी 640 किलोमीटरचा प्रवास

माथेफिरू प्रियकराचं धक्कादायक कृत्य; प्रेयसीवर अॅसिड फेकण्यासाठी 640 किलोमीटरचा प्रवास

एका माथेफिरू व्यक्तीने धक्कादायक कारस्थान रचलं. हा माथेफिरू तब्बल 640 किलोमीटर अंतर पार करून प्रेयसीवर हल्ला करण्यासाठी आला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

पानीपत, 13 फेब्रुवारी : हरियाणातील (Haryana News) पानीपतमध्ये एका माथेफिरू व्यक्तीने धक्कादायक कारस्थान रचलं. हा माथेफिरू तब्बल 640 किलोमीटर अंतर पार करून प्रेयसीवर हल्ला करण्यासाठी आला होता. या माथेफिरू प्रियकराने हे भयंकर कृत्य करण्याचा कट रचला. उत्तर प्रदेशातून अॅसिड घेऊन माथेफिरू पानिपतला पोहोचला होता. जिथे त्याने त्याच्या पसंतीच्या मुलीचा ती कंपनीतून काम करून घरी परतत असताना मार्ग अडवला. यावेळी तिच्यासोबत तिची आईदेखील होती. यानंतर त्याने मुलीचा हात पकडला. त्याला मुलीच्या आईने विरोध केला, त्यानंतर त्याने धक्काबुक्की सुरू केली. त्याने हातात अॅसिड घेऊन मुलीवर फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हाणामारी पाहून लोकांच्या जमावाने त्याला पकडलं. स्थानिकांनी याची सूचना पोलीस कंट्रोल रूमला दिली. सूचना मिळताच 112 गाडी तातडीने घटनास्थळी आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि स्थानिक पोलिसांना सूचित केलं. सूचना मिळताच किशनपूर चौकी पोलीस आणि चांदनीबाग पोलिस घटनास्थळी पोहोचले. यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. हे ही वाचा- लेकाच्या लग्नात डीजेवर नाचता नाचता आईचा मृत्यू; नवरदेवाच्या कुशीतच सोडला जीव त्या मुलीवर माझं प्रेम आहे, माझ्या स्वाधीन करा, अन्यथा…अॅसिड फेकेन चिडलेल्या योगेशने मुलीचा हात धरला. ज्याला आई आणि मुलगी दोघांनीही विरोध केला होता. त्यावर मुलगा महिलेला म्हणाला की, मला तुमची मुलगी आवडते. तिला माझ्याकडे सोपवा. ती माझ्याकडेच असेल. जर तुम्ही ते माझ्या ताब्यात दिले नाही तर मी तिच्यावर अॅसिड टाकेन. त्याच्या भावांनाही मारून टाकीन. हे ऐकल्यानंतर ती महिला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्याच्यासमोर उभी राहिली. ही घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजता शिवनगरमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस तपासानुसार ऑक्टोबर 2020 मध्ये पीडिता जेव्हा 18 वर्षांची होती, तेव्हा ती घरातून संशयास्पदरित्या बेपत्ता झाली होती. यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तब्बल चार दिवसांनंतर तरुणी उत्तर प्रदेशातून कानपूरहून ताब्यात घेण्यात आलं होतं. पोलीस चौकशीत पीडितेने सांगितलं की, योगेश तिला खोटं सांगून आपल्या सोबत घेऊन गेला होता. मात्र तरीही योगेश तिला वारंवार त्रास देत होता. दीड वर्षात अनेकदा तो पानीपतला येऊन मुलीवर अॅसिड फेकण्याची धमकी देत होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात