JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / क्रूरतेचा कळस! मुलीनं Love Marriage केलं म्हणून जन्मदात्यानेच तिच्या मानेवर चालवला पेपर कटर

क्रूरतेचा कळस! मुलीनं Love Marriage केलं म्हणून जन्मदात्यानेच तिच्या मानेवर चालवला पेपर कटर

आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून वडिलांनी (Father) मुलीची (Daughter) मान कापण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 16 ऑगस्ट : आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून वडिलांनी (Father) मुलीची (Daughter) मान कापण्याचा प्रयत्न केला. दारूच्या नशेत मुलीच्या घरात घुसून पेपर कटरनं (Paper Cutter) त्यांनी मुलीच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यातून मुलगी थोडक्यात बचावली (Survived) असून पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. मुलीने केला होता प्रेमविवाह ही घटना आहे तमिळनाडूच्या थिरुप्पूर गावातली. या गावात राहणारे पुराजा हे चित्रकार म्हणून काम करतात. त्यांची मुलगी प्रियंकाचं मोहम्मद यासीन नावाच्या तरुणावर प्रेम होतं. कपड्यांच्या कंपनीत काम करताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. मात्र हे संबंध प्रियंकाच्या घरच्यांना मान्य नव्हते. प्रियंकांच्या वडिलांना मोहम्मदला कधीही न भेटण्याची ताकीद देत प्रियंकाला आत्याच्या घरी नेऊन ठेवलं. पळून जाऊन केलं लग्न आत्याच्या घरी राहणाऱ्या प्रियंकानं मोहम्मदसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर प्रियंका मोहम्मद आणि त्याच्या कुटुंबासह सुखात राहत होती. मात्र हे लग्न मान्य नसलेल्या पुराजा यांनी मुलीला धडा शिकवण्याचं ठरवलं. एक दिवस दारूच्या नशेत ते मुलीच्या घरी आले. यावेळी घरातील सर्वजण आपापल्या कामानिमित्त घराबाहेर गेले होते. पूराजा यांनी पेपर कटर घेत मुलीच्या गळ्यावर वार करायला सुरुवात केले. मुलीला मारून टाकण्याच्या इराद्याने त्यांनी पेपर कटरने मुलीचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. यात प्रियंकाच्या गळ्याला जखम झाली मात्र तिचा जीव वाचला, अशी बातमी ‘ आजतक ’नंं दिली आहे. हे वाचा - 50 रुपयांच्या वादात 18 महिन्यांच्या बाळाचा घेतला जीव; टेरेसवर नेलं आणि… प्रियंकावर हल्ला करून पळून गेलेल्या पुराजाला पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रियंकाचा आरडाओरडा ऐकून धावत आलेल्या शेजाऱ्यांनी तिला वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. प्रेमविवाह या संकल्पनेलाच आपला विरोध असून आपल्या मुलीने कुणाहीसोबत प्रेमविवाह केला असता, तरी आपण तिची हत्या केली असती, अशी प्रतिक्रिया पुराजा यांनी पोलिसांना दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या