JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / दुसऱ्या पत्नीला खूश करण्यासाठी केला पोटच्या लेकीचा खून, फिल्मी स्टाईलने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

दुसऱ्या पत्नीला खूश करण्यासाठी केला पोटच्या लेकीचा खून, फिल्मी स्टाईलने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

दुसऱ्या पत्नीला (Wife) खूश करण्यासाठी पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीची (Daughter) जन्मदात्या बापानेच (Father) हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

झाशी, 29 ऑगस्ट : दुसऱ्या पत्नीला (Wife) खूश करण्यासाठी पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीची (Daughter) जन्मदात्या बापानेच (Father) हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर (Death) दुसरं लग्न केल्यावर पत्नी आणि मुलीचं बिलकूल पटत नव्हतं. त्यामुळे पत्नीला खूश करण्यासाठी पतीने आपल्या मुलीचीच हत्या केली. त्यानंतर फिल्मी स्टाईलने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचं बिंग फोडलं आणि त्याला अटक केली. पत्नीला केलं खूश झाशी जिल्ह्यातील गुरसरांयमध्ये राहणाऱ्या अमित शुक्लाचं आकांक्षा शुक्ला हिच्याशी 2018 साली दुसरं लग्न झालं होतं. 2012 साली त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्याने मुलगी खुशीला तिच्या मामाकडे ठेवलं होतं. दुसरं लग्न झाल्यानंतर तो मुलीला घरी घेऊन आला. एकाच घरात राहणाऱ्या अमित, आक्षांका आणि मुलगी खुशीचे सुरुवातीचे काही दिवस चांगलेच गेले. मात्र त्यानंतर 12 वर्षांच्या खुशीसोबत आकांक्षाचं पटेनासं झालं आणि दोघींमध्ये छोट्या मोठ्या कारणावरून खटके उडायला लागले. त्यावर आपल्याला आपल्या संसारात ही मुलगी नको असल्याचं आकांक्षानं अमितला सांगितलं. त्यानंतर अमितनं पोटच्या मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह घरातच ठेऊन दिला. केलं फिल्मी नाटक खून केल्यानंतर अमित मऊरानीपूरला गेला आणि तिथून परत येत आपल्याला या घटनेनं धक्का बसल्याचं नाटक करू लागला. आपण गावाबाहेर असताना ही घटना घडल्याचं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता.  मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवून चौकशी करताच त्याने हत्येची कबुली दिली. आपल्या पत्नीला खूश करण्यासाठी आपण मुलीची हत्या केल्याचं त्यानं सांगितलं. हे वाचा - हिंदुत्ववादी संघटनेकडून डोसा सेंटरची तोडफोड, ECONOMIC JIHAD चा आरोप पोलिसांनी अमित शुक्लावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र पत्नीला खूश करण्यासाठी पोटच्या मुलीची हत्या केल्यामुळे परिसरात अमितच्या कृत्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या