यमुनानगर, 27 फेब्रुवारी : घरच्यांनी सांगितलेल्या लग्नाच्या स्थळाला नकार देत एक तरुणी स्वत:च्या मर्जीतील दुसऱ्या तरुणाशी लग्न करण्यावर ठाम होती. तिला घरच्यांनी समजावली तरीही ती तिच्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे रागाच्या भरात तिच्या पित्याने आपल्या मुलीची हत्या केली. ज्या हातांनी वडिलांनी आपल्या मुलीला सांभाळले, मोठे केले, त्यांनी मुलीची हत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मृताचे मामा घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मामाच्या जबानीवरून पोलिसांनी मृताचे वडील विजय, काका सुशील उर्फ बिट्टू यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयताच्या मामाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना मृताच्या वडिलांनी सांगितले होते की, त्यांच्या मुलीचे एका मुलावर 4-5 वर्षांपासून प्रेम होते आणि तिला त्याच्याशीच लग्न करायचे आहे. यावरुन तिच्या घरच्यांनी तिला समजावून सांगितला. काही दिवस ती मुलगी घरी बरी होती, पण जवळपास 2 महिन्यांपासून ती पुन्हा त्याच मुलाशी फोनवर बोलू लागली. यानंतर घरच्यांनी पुन्हा मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने ते ऐकले नाही. याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी सांगितले होते की, जर तिने आपले त्या मुलाचा नाद सोडला नाही, एक दिवस ती त्याच्या हातून मारले जाईल. या मुलीने समाजात आपले नाक कापून टाकले आहे, असे मृताचे वडील विजय कुमार यांना त्याचा भाऊ सुशील कुमार उर्फ बिट्टू हा भडकवायचा. पैशांची लालसा महिला शिक्षिकेला भोवली, केलं हे कृत्य अन् गमावली सरकारी नोकरी रविवारी सकाळी 7.55 च्या सुमारास त्यांना मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती फोनवर मिळाली. यानंतर मुलासह ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांची भाची व्हरांड्यात पडली होती. तिच्या नाकावर, तोंडावर, डाव्या डोळ्याखाली आणि गळ्यावर जखमेच्या खुणा होत्या. मृताचे वडील विजय ताया सुशील कुमार उर्फ बिट्टू यांच्यावर मामाने संशय व्यक्त केला, त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.