JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / एका बिडीसाठी महिलेचा भर रस्त्यात खून, नशेबाज आरोपीला अटक; पाहा VIDEO

एका बिडीसाठी महिलेचा भर रस्त्यात खून, नशेबाज आरोपीला अटक; पाहा VIDEO

केवळ एका बिडीवरून झालेल्या वादानंतर नशेबाज आरोपीनं (Drug addict murdered a vegetable vendor just for sake of bidi) महिलेवर धारदार शस्त्रांनी वार करून तिचा खून केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : केवळ एका बिडीवरून झालेल्या वादानंतर नशेबाज आरोपीनं (Drug addict murdered a vegetable vendor just for sake of bidi) महिलेवर धारदार शस्त्रांनी वार करून तिचा खून केला आहे. भर बाजारपेठेत, सर्वांसमोर (Murder in Public place) आरोपीनं महिलेचा खून केला. परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून पोलिसांनी (Police arrested murderer) आरोपीला अटक केली आहे. बिडीवरून झाला वाद दिल्लीतील दाबरी परिसरात विभा नावाची महिला तिच्या पतीसोबत भाजीपाला आणि किरकोळ किराणा मालाची विक्री करण्याचं काम करते. बाजारपेठेतून ताज्या भाज्या खरेदी करून परिसरातील नागरिकांना त्या विकण्याचं काम ही महिला करत असे. आपल्या पतीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून ही महिला या परिसरात व्यवसाय करत होती. याच दुकानावर कुटुंबाचा चरितार्थ सुरू होता.

चरसीसोबत वाद विभाच्या दुकानात दीपक नावाचा एक ड्रग्ज ऍडिक्ट तरुण आला. त्याने विभाकडं बिडीची मागणी केली. त्याचा अवतार पाहून विभानं त्याला बिडी द्यायला नकार दिला. बिडी देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वादावादीला सुरुवात झाली. काही वेळातच या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. दीपक नावाच्या या माथेफिरू इसमानं त्याच्या बॅगेतील धारदार शस्त्र काढून महिलेवर निर्घृण वार केले. यावेळी आजूबाजूला रहदारी होती, वाहनांची ये-जा सुरु होती, अनेक पादचारी चालले होते. तरीही या महिलेला कुणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. हे वाचा - मोठी बातमी: पुन्हा एकदा Cordelia क्रूझवर धाड, 8 जण ताब्यात दीपकने महिलेवर धारदार शस्त्रांनी वार केले आणि महिलेचा खून केला. त्यानंतर आपली पिशवी घेऊन थंड डोक्याने आरोपी तिथून निघून गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपीला अटक केली आहे. आरोपी प्लंबिंगचं काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्रानं त्याने महिलेची हत्या केली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या