JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, काकाचं पुतण्यासोबत धक्कादायक कृत्य

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, काकाचं पुतण्यासोबत धक्कादायक कृत्य

पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर, 6 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनैतिक संबंध यातून हत्या तसेच आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात धरून चुलत काकांनी आपल्या पुतण्याची चाकूने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना पालघरमधील वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अतुल विलास तांडेल, असं 23 वर्षीय मृत पुतण्याचं नाव आहे. तर आरोपी दिनेश हरिश्चंद्र तांडेल याला वाणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये शोध मोहीम राबवून अटक केली आहे. वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावडे , नवापाडा येथील हा धक्कादायक प्रकार घडला. मृत तरुण आपल्या घरी हॉलमध्ये झोपला असताना आरोपीने घरात जाऊन त्याच्या पोटात धारदार चाकूने वार करून त्याची निघृण हत्या केली. या संदर्भात वाणगाव पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच वानगाव पोलिसांनी आरोपीला सापळा रचून जंगलातून अटक केली आहे. या संदर्भात वानगाव पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या