JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Dog Bite Girl : मुलगी खेळत असताना पिटबुल कुत्र्याने तोडली लचके, पुढे जे घडलं ते भयानक

Dog Bite Girl : मुलगी खेळत असताना पिटबुल कुत्र्याने तोडली लचके, पुढे जे घडलं ते भयानक

गाय-बैल, शेळी-मेंढीसारखे पाळीव प्राणी शांतताप्रिय समजले जातात. श्वान म्हणजेच कुत्रा हा तुलनेनं जास्त आक्रमक मानला जातो.

जाहिरात

गच्चीवर खेळणाऱ्या मुलीवर कुत्र्याचा हल्ला; चेहऱ्यावर चावा घेऊन केलं गंभीर जखमी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 डिसेंबर : गाय-बैल, शेळी-मेंढीसारखे पाळीव प्राणी शांतताप्रिय समजले जातात. श्वान म्हणजेच कुत्रा हा तुलनेनं जास्त आक्रमक मानला जातो. पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा सर्वांत लोकप्रिय प्राणी आहे. अनेकजण विविध जातींचे कुत्रे पाळतात. त्याला सर्वांत प्रामाणिक प्राणी म्हटलं जातं; मात्र हाच प्रामाणिक प्राणी कधी-कधी फार हिंस्र ठरू शकतो, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. हरियाणातल्या कर्नाल जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. एका पाळलेल्या पिटबुल कुत्र्याने गच्चीवर खेळणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर हल्ला केला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नऊ वर्षांची मुलगी गच्चीवर खेळत असताना शेजाऱ्यांनी पाळलेल्या पिटबुल कुत्र्याने उडी मारून तिच्यावर हल्ला केला. पिटबुलच्या मालकिणीनं खूप प्रयत्नांनंतर मुलीला त्याच्या ताब्यातून सोडवलं; पण तोपर्यंत त्याने मुलीच्या चेहऱ्याची एक बाजू चावली होती. त्यानंतर मुलीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे ही वाचा :  युवकाच्या हत्येचे कारण ठरलं मोबाईल अन् गावात आरोपींची घरेच जाळली

संबंधित बातम्या

मुलीवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलं, की मुलीला जखमी अवस्थेत येथे दाखल करण्यात आलं आहे. कुत्र्याने मुलीच्या चेहऱ्यावर चावा घेतला आहे. मुलीच्या तोंडावर आणि कानावर मोठ्या जखमा आहेत. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. जखम मोठी असल्याने तिचं ऑपरेशन केलं जाणार आहे.

कर्नालच्या शिव कॉलनीतल्या गल्ली क्रमांक 2 मध्ये राहणाऱ्या मुलीच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, मुलीचे वडील गावी गेले आहेत. शेजारी पाळलेल्या पिटबुलने मुलीला चावा घेतल्याची माहिती मिळताच तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. या पिटबुलमुळे आजूबाजूला राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पिटबुल मोकळा फिरत असल्याची माहिती त्याच्या मालकाला अनेकदा देण्यात आली; मात्र मालकाने त्यावर काहीही उपाययोजना केली नाही. मालकाच्या निष्काळजीपणाचे दुष्परिणाम एका लहान मुलीला भोगावे लागत आहेत.

जाहिरात

हे ही वाचा :  प्रेमिकेला भेटू दिले नाही, माथेफिरुने शाळेच्या मुख्याध्यापकासोबत केलं भयानक कांड

या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. कुत्र्याच्या मालकावर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, कर्नालमध्ये यापूर्वीही अनेकदा पिटबुल जातीच्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. एवढे धोकादायक पिटबुल कुत्रे नागरी परिसरात ठेवणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या