अमित राय/ पनवेल, 29 सप्टेंबर : जर तुम्ही घरात एकटे आहात आणि तुम्ही खाण्यासाठी काही ऑनलाइन ऑर्डर केली असेल तर पार्सल घेताना सावध राहणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हालाही वाईट अनुभव येऊ शकतो. मुंबईजवळी पनवेल भागातून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने ऑनलाइन जेवणाची ऑर्डर केली. जेव्हा डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन तरुणीच्या घरी पोहोचला तर आपले पैसे घेतल्यानंतर तरुणीसोबत अश्लील कृत्य करून तेथून फरार झाला. या प्रकरणात आरोपीचा फोटोही समोर आला आहे. पनवेल पोलिसांकडून या तरुणाचा शोध सुरू आहे. हा तरुण जेवणाची डिलिव्हरी करण्याच्या बहाण्याने तरुणीच्या छातीवर स्पर्श करून फरार झाला. हॉटेलमधील रूममध्ये थांबली होती अल्पवयीन मुलगी, मालकाच्या मुलाने केलं संतापजनक कृत्य ही घटना पनवेल येथील इंडियाबुल्स इमारतीतील आहे. येथे घरात एकटी राहणाऱ्या तरुणीने ऑनलाइन जेवण मागवलं. डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन आला आणि पैसे घेतल्यानंतर तरुणीसोबत अश्लील कृत्य केलं. यानंतर महिलेला घडलेला प्रकार पोलिसात सांगितला. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि डिलिव्हरी बॉयचा फोटो समोर आला. पोलिसांनी या तरुणाविरोघात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस याचा शोध घेत आहेत. यापूर्वीही पुण्यात एका डिलिव्हरी बॉयने पार्सल दिल्यानंतर तरुणीला किस केल्याचं समोर आलं होतं. तर दुसऱ्या वेळी येथे डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या छातीला स्पर्श करून फरार झाला.