JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / डिप्रेशनमधील तरुणींना पैशाचं आमिष देत मागायचा nude photo; मग सुरू व्हायचं ब्लॅकमेलिंग, अशी झाली पोलखोल

डिप्रेशनमधील तरुणींना पैशाचं आमिष देत मागायचा nude photo; मग सुरू व्हायचं ब्लॅकमेलिंग, अशी झाली पोलखोल

दक्षिण आशियातल्या (South Asia) तरुणींशी संपर्क साधण्यासाठी आपण टॉक लाइफ या अॅपचा वापर केल्याचं आरोपीने चौकशीदरम्यान कबूल केलं.

जाहिरात

Depression and sadness

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 23 जुलै: मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या आणि पैशांची गरज असलेल्या तरुणी-महिलांना ऑनलाइन पद्धतीने हेरून, त्यांना न्यूड फोटो-व्हिडिओच्या बदल्यात पैसे देण्याचं आमिष देत नंतर त्यांना ब्लॅकमेल (Blackmail) करणाऱ्या 21 वर्षांच्या युवकाला दिल्ली सायबर पोलिसांनी (Cyber Police) अटक केली आहे. टॉक लाइफ नावाच्या अॅपचा वापर यासाठी करण्यात आल्याचं उघड झालं आहे. याबद्दल इंडोनेशियातल्या (Indonesia) एका महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ‘लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. दिल्लीच्या (Delhi) दिलशाद गार्डन (Dilshad Garden) परिसरात वास्तव्य असलेल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं. त्याच्याकडून दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. महिलांचे न्यूड फोटो-व्हिडिओ (Nude Photo-video) साठवण्यासाठी त्या मोबाइल फोन्सचा (Mobile Phone) वापर करण्यात आला होता. दक्षिण आशियातल्या (South Asia) तरुणींशी संपर्क साधण्यासाठी आपण टॉक लाइफ या अॅपचा वापर केल्याचं आरोपीने चौकशीदरम्यान कबूल केलं. आईसमोर वाईट बोलल्यानं तरुणाची सटकली; भररस्त्यात मित्राची चाकू भोकसून हत्या विशेषकरून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्यांकडून टॉक लाइफ (Talk Life App) हे अॅप वापरलं जातं, याची आरोपीला कल्पना होती. त्याने आर्थिकदृष्ट्याही कमजोर (Economically Weaker) असलेल्या महिला हेरून त्यांच्याशी अॅपवरून संवाद (Chat) साधायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने व्हॉट्सअॅपवरूनही त्यांच्याशी संवाद वाढवला. अशा सुमारे 15हून अधिक तरुणींशी त्याचं चॅट सुरू होतं आणि तीन तरुणींचे नग्नावस्थेतले फोटो-व्हिडिओ त्याने प्राप्त केले आहेत, अशी माहितीही त्याच्या चौकशीत उघड झाली. 6 महिन्यांपासून मुलीवर बलात्कार करत होता बाप; 10 वर्षीय भावानं केली सुटका इंडोनेशियातल्या ज्या महिलेने तक्रार दाखल केली, तिने दिलेल्या माहितीनुसार, टॉक लाइफ अॅपवर तिची संबंधित आरोपीशी गाठ पडली. नग्नावस्थेतले फोटो-व्हिडिओ पाठवल्यास महिन्याला 200 ते 300 डॉलर देण्याचं आश्वासन आरोपीने आपल्याला दिल्याचं पीडित महिलेने सांगितलं. आपली आर्थिक स्थिती चांगली नव्हती आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैशांची नितांत गरज होती, त्यामुळे तसे फोटो-व्हिडिओ देण्यास आपण तयार झाल्याचं पीडितेने सांगितलं. प्रत्यक्षात मात्र आरोपीने आपलं आश्वासन पाळलं नाही आणि पैसे दिलेच नाहीत. उलट, संबंधित महिलेला त्याने धमकी द्यायला सुरुवात केली. आणखी फोटो-व्हिडिओ पाठवले नाहीत, तर आधीचे फोटो-व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाइल नंबरच्या आधारे तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या