दिल्ली खून प्रकरणात मोठा खुलासा
दिल्ली, 02 जून : दिल्लीच्या शाहबाद डेरी परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी आता नवा खुलासा झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिलला तिला मारायचं नव्हतं. ती त्याला खूप आवडत होती. पण तिने साहिलचा अपमान केला होता, त्यामुळे बदला घेण्याचा विचार त्याच्या डोक्यात शिरला होता. साहिल त्याच्या पाच मित्रांचा तिरस्कार करू लागला होता. ज्यांनी त्याचा अपमान केला होता. कारण टॉग गन लावली तेव्हा ते पाचही मित्र त्याठिकाणी होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खूनाच्या घटनेच्या आदल्यादिवशी साहिलला अल्पवयीन मैत्रिणीसह त्याच्या मित्रांना वाटेत भेटली होती. तेव्हा तिने खेळण्यातल्या बंदुकीने धमकी दिली तसंच अपशब्दात बडबडली होती. तेव्हा साहिल काहीही न बोलता तिथून निघाला होता. कारण त्याच्या मैत्रिणीने मित्रांसमोरच त्याला कमी लेखलं होतं. हा अपमान साहिल सहन करू शकला नाही. त्यानंतरच तो बिथरला आणि संधीची वाट बघत होता. तेव्हापासून तो अल्पवयीन मैत्रीण आणि सर्व मित्रांचा तिरस्कार करत होता. Crime News: 10 जणांची गोळ्या झाडून केलेली हत्या; 42 वर्षांनंतर कोर्टाने 90 वर्षीय आरोपीला सुनावली ही शिक्षा अल्पवयीन मैत्रीण आणि त्याच्या मित्रांनी साहिलच्या डोक्यात बरचं काही भरवलं होतं. घटनेच्या दिुवशी दुपारी तो दारु प्यायला होता. खिशात चाकू घेऊन तो परिसरात घुटमळत होता. सांयकाळी संधीच्या शोधात होता. अल्पवयीन मैत्रीण आणि मित्र यांच्यातलं जो कोणी दिसेल त्याला सोडणार नाही. तेव्हा दुर्दैवाने अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीकडे वाढदिवसासाठी जात होती. वाटेत तिला साहिल भेटला. त्याने रागाच्या भरातच निर्घृणपणे तिची हत्या केली. साहिलने पोलिसांना सांगितले की, त्या दिवशी अल्पवयीन मैत्रीण भेटली नसती तर त्या मित्रांचाही जीव घेतला असता ज्यांनी अपमान केला होता. आता साहिलच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहेत.