JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / कंझावाला अपघात प्रकरण : सातवा आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचला, स्वतःच केलं सरेंडर

कंझावाला अपघात प्रकरण : सातवा आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचला, स्वतःच केलं सरेंडर

आशुतोष खन्ना नावाच्या या आरोपीने शुक्रवारी सुलतानपुरी ठाण्यात सरेंडर केलं. सरेंडरनंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 07 जानेवारी : सध्या दिल्लीतल्या कांझवाला इथलं ‘हिट अँड रन’ प्रकरण देशभरात चर्चेचा विषय आहे. एका ग्रे बलेनो कारने 20 वर्षीय अंजलीला सुलतानपुरी इथे धडक देऊन कांझवालापर्यंत फरपटत नेलं होतं. हे अंतर 12 किलोमीटर इतकं होतं. या घटनेत अंजलीचा मृत्यू झाला. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. आता सुलतानपुरी-कांझावाला प्रकरणातील सातव्या आरोपीने शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांसमोर स्वतःच सरेंडर केलं आहे. दिल्लीसारखी आणखी एक घटना; कारने 15 वर्षीय विद्यार्थ्याला 1 KM फरफटत नेलं, पाहा Shocking Video आशुतोष खन्ना नावाच्या या आरोपीने शुक्रवारी सुलतानपुरी ठाण्यात सरेंडर केलं. सरेंडरनंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. आशुतोषला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेत निधीच्या भूमिकेबाबत कोणतीही क्लीन चिट देण्यात आलेली नाही, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. निधीचीही चौकशी केली जात आहे. निधी या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. ही घटना घडली तेव्हा दीपक गाडी चालवत असल्याचं आधी म्हटलं जात होतं. मात्र घटनेच्या वेळी अमित गाडी चालवत असल्याचं नंतर समोर आलं. अमितकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याने त्याने आरोपींला वाचवण्याचा प्रयत्न केला. अंजलीला फरफटत नेणाऱ्या कारचा मालक पोलिसांना सापडला; आरोपींना अशी केली होती मदत घटनेच्या वेळी दीपक घरातच उपस्थित होता, असं तपासात समोर आलं आहे. आरोपी आशुतोष आणि अंकुश यांनी खोटे बोलून आरोपींला वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आरोपींची सतत चौकशी करत आहेत, त्यांची वक्तव्य परस्परविरोधी आहेत. त्यामुळे त्यांची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचाही विचार पोलीस करत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी 18 पथके कार्यरत आहेत. एका पथकाने शुक्रवारी पुन्हा हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या