JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / दुकान बंद करून घरी निघाला पण पोहचलाच नाही; सराफा व्यापाऱ्यासोबत घडले भयंकर कृत्य

दुकान बंद करून घरी निघाला पण पोहचलाच नाही; सराफा व्यापाऱ्यासोबत घडले भयंकर कृत्य

हरीश राजपूत हे आपलं दुकान बंद करून डोंबिवलीमध्ये असलेल्या आपल्या घरी येण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. मात्र ते घरी परतलेच नाहीत.

जाहिरात

प्रातिनिधिक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायगड, 4 डिसेंबर: कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील कशेळे येथील सोन्याचे व्यापारी हरीश राजपूत यांचा रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुकान बंद करून घरी निघाले  घटनेबाबात अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील कशेळे येथील सोन्याचे व्यापारी हरीश राजपूत हे काल आपलं दुकान बंद करून आपल्या डोंबिवलीमध्ये असलेल्या घरी निघाले होते. मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नेरळ पोलीस ठाणे गाठत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. हेही वाचा :   Video : आता रावसाहेब दानवेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान? नव्या वक्तव्याने वाद चिघळला हत्येचा संशय   तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी हरीश राजपूत यांचा शोध सुरू केला. शोध सुरू असतानाच पोलिसांना  नेरळ कशेळे रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यामध्ये हरीश राजपूत यांचा मृतदेह आढळून आला. हरीश राजपूत यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी हरीश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यू नेमका कसा झाला हे स्पष्ट होणार आहे. हरीश यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. तसेच त्यांची बाईक ज्या स्थितीमध्ये आढळून आली त्यावरून ही हत्या असावी असा प्राथमिक अंदाज आहे. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या