जयपूर, 12 मे : राजस्थानातील (Rajasthan News) जयपूर शहरातील कुंहाडी पोलीस ठाणे हद्दीतील कोचिंगमधील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतक रितेश पाल हा मध्य प्रदेशातील राहणारा होता. गेल्या दोन वर्षांपासून तो कोटामध्ये कोचिंग करीत होता. तो लँडमार्क सिटी भागात हॉस्टेलमध्ये राहत होता. रितेश आपल्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. ड्यूटीवरील डॉक्टरांनी तपासताच त्याला मृत (Crime News) घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हर्ष रेजिडेन्सीमध्ये राहत होता. तो खोलीतून बाहेरच आला नव्हता. आणि फोनही उचलत नव्हता. खोली आतून बंद होती. यानंतर हॉस्टेल संचालक गेट तोडून आत गेले. रितेश बेडवर बेशुद्धावस्थेत पडला होता. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. त्याच्या जवळपास कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं कारण समोर येईल.
हे ही वाचा- भक्तांना लघवी आणि कफ पाजून उपचार करायचा अघोरी बाबा; छाप्यात आढळले 11 मृतदेह
मृत मुलाचे वडील राम सिंह पाल यांनी सांगितलं की, ते शिक्षक आगेत. त्यांना दोन मुलं आहेत. रितेशला कोटात शिकण्यासाठी पाठवलं होतं. एका दिवसापूर्वी कुटुंबातील सदस्यांसोबत फोनवर बोलणं झालं होतं. सायंकाळी त्याला कॉल केला, पण त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी हॉस्टेल संचालकांना फोन केला. ज्यानंतर त्याने खोलीचा गेट तोडला आणि ते आत शिरले. रितेश बेशुद्धावस्थेत पडले होते.