रोशनी
अश्वनी कुमार, प्रतिनिधी झाशी, 20 जुलै : दिवसेंदिवस देशामध्ये धक्कादायक घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळभळ उडाली आहे. आत्महत्येप्रकरणी खुलासा झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं - 2 वर्षांपूर्वी रोशनी नावाच्या एका तरुणीचे झाशी येथील कालीचरण नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. कालीचरण सोबत रोशनी ही 2 वर्षांपासून खूप आनंदी होती. रोशनीचा पती कालीचरण हा एटीएममध्ये सुरक्षारक्षक होता. दोन महिन्यांपूर्वी कालीचरणला कंपनीने एटीएम गार्डच्या नोकरीवरुन मुक्त केले. रोशनी बीटीसी पास होती. त्यामुळे तिने थोडे प्रयत्न केल्यावर तिलाही एका शाळेत शिक्षकाची एक चांगली नोकरी मिळाली.
मात्र, दुसरीकडे रोशीच्या घरच्यांचे म्हणणे होते की, रोशनी दिसायला खूप सुंदर आहे. त्यामुळे रोशनीच्या सासरची लोक तिला नोकरी करू देण्याच्या विचारात नव्हते. अनेक वेळा बीटीसी पास असलेल्या रोशनीने आपल्या सासरच्या लोकांशी नोकरीसंदर्भात बोलणे केले. यावर, रोशनी तु खूप सुंदर आहे आणि सध्या समाजात फार वाईट घटना घडत आहेत, असे सांगत तिला नोकरी करण्यास मनाई केली. रोशनीचे घेतला धक्कायक निर्णय - पतीची नोकरी गेल्यानंतर रोशनीने सासरच्या लोकांच्या विरोधात जाऊन एका शाळेत नोकरी शोधली होती. मात्र, नोकरीच्या पहिल्याच दिवशी रोशनी जेव्हा शाळेत जाण्यासाठी तयार झाली. पण नंतर अचानक ती संध्याकाळपर्यंत आपल्या रुमच्या बाहेर नाही आली. फुटबॉल मॅच खेळायला गेलेला तिचा पती कालीचरण खूप वेळेनंतर जेव्हा घरी परत आला तेव्हा त्याला रोशनी नाही दिसून आली. त्यानंतर त्याने रोशनीच्या रुमच्या दाराला बाहेरुन अनेकदा ठोठवले. मात्र, आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना बोलवण्यात आले. यानंतर रुम जेव्हा उघडण्यात आला, तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. रोशनी घरातील त्या रुममध्ये दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी म्हटले की, रोशनीने कोणत्या परिस्थितीत आपल्या घराच्या आत गळफास घेतला, तिचा छळ सुरू होता का की मग तिच्या पतीची नोकरी गेल्यानंतर ती तणावात होती, या सर्व बाबींवर पोलीस तपास करत आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वांना धक्का बसला आहे.