JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / आईच्या मृतदेहासमोर ढसाढसा रडला, अंत्यसंस्कारही केले; 24 तासानंतर हत्येचं गूढ उलगडलं, कुटुंबाला धक्का!

आईच्या मृतदेहासमोर ढसाढसा रडला, अंत्यसंस्कारही केले; 24 तासानंतर हत्येचं गूढ उलगडलं, कुटुंबाला धक्का!

अद्यापही कुटुंबीयांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटना, 7 जुलै : जो मुलगा आपल्या आईच्या हत्येनंतर ढसाढसा रडत होता. ज्याने आपल्या आईवर (Killed Mother) अंत्यसंस्कार केले. मुखाग्नी दिला. त्याच मुलाला पोलिसांनी 24 तासांच्या आत आईची हत्या केल्या प्रकरणात अटक केली आहे. ही घटना बिहारची राजधामी पाटनाच्या पुनपुन भागातील आहे. पिपरा गावातील महिलेची हत्या 4 जुलैच्या रात्री करण्यात आली होती. 40 वर्षीय महिला इंदू देवीचा पती राम सिंहने 5 जुलै रोजी अज्ञातांविरोधात पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. तपासानुसार, तिचा मुलहा ओमप्रकाश यानेही आईची हत्या केल्याचं समोर आलं. आईची हत्या करण्यासाठी त्याला काकानेच शस्त्र दिलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जुलैच्या रात्री जेव्हा इंदू देवी आपली बहीण आणि पुतणीसोबत झोपली होती, तेव्हा रात्री 11 वाजता ओमप्रकाश छतावरुन खाली उतरला आणि आईच्या डोक्यावर गोळी झाडून फरार झाला. गोळी झाडल्यानंतर तो गावातील मंदिरात बसून राहिला. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर तो परतला आणि आईला मिठी मारून रडू लागला. पोलिसांना मुलाच्या वागणुकीवरुन संशय आला. गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधाराने पोलिसांनी तपास सुरू केला. शेवटी ओमप्रकाशने सर्व सत्य पोलिसांना सांगितलं आणि आपला गुन्हा कबुल केला. ओमप्रकाशने सांगितलं की, त्याला आपल्या आईच्या चारित्र्यावर संशय होता. त्याच्या आईचे गावातील एका व्यक्तीसोबत अवैध संबंध होते. म्हणून त्याने आईची हत्या केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या