हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण आदेश
भुवनेश्वर, 8 जुलै : ओरिसा उच्च न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणात मोठी टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, लग्नाचे आश्वासन देऊन संमतीने शारीरिक संबंध ठेवले असेल. जे काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकले नाही, तर तो बलात्कार मानता येणार नाही. अशी टिप्पणी करून न्यायालयाने भुवनेश्वरमधील एका व्यक्तीवरील बलात्काराचा आरोप रद्द केला. त्याच्यावर हे आरोप एका महिलेने लावले आहेत, जिचा तिच्या पतीसोबत पाच वर्षांपासून वैवाहिक वाद सुरू आहे. खंडपीठाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशात म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने लग्नाचे आश्वासन देऊन एखाद्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवले, जे नंतर काही कारणांमुळे पूर्ण झालं नाही, तर तो बलात्कार आहे असे म्हणता येणार नाही. कोर्टाने म्हटले आहे की, असे नाते नेहमी अविश्वासाचे उत्पादन म्हणून ओळखले जाऊ नये आणि पुरुष जोडीदारावर कधीही गैरवर्तनाचा आरोप होऊ नये. वचनाचा भंग आणि खोटी आश्वासने यात फरक न्यायमूर्ती आरके पटनायक यांनी आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्त्यावरील फसवणुकीसारखे इतर आरोप तपासासाठी खुले ठेवण्यात आले आहेत. आश्वासने सद्भावनेने दिली जातात. वचनाचा भंग आणि लग्न करण्याची खोटी आश्वासने यात एक बारीक रेषा आहे. वाचा - माणूस की राक्षस? पत्नीची क्रूर हत्या, मेंदू चपातीत भरुन खाल्ला, कवटीचा अॅश ट्रे कलम 376 हा गुन्हा का मानला गेला नाही? पूर्वीच्या प्रकरणात, अशी कोणतीही जवळीक आयपीसीच्या कलम 376 नुसार गुन्हा ठरत नाही, तर नंतरचे कारण असे की लग्नाचे आश्वासन सुरुवातीपासूनच खोटे होते, असे उच्च न्यायालयाच्या 3 जुलैच्या आदेशात म्हटले आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीकडून पैसेही उकळले. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम पायगुडे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. शुभमसह पाच जणांविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरुणीची फसवणूक करत आरोपीने घरच्यांच्या मर्जीने दुसऱ्या मुलीशी साखरपुडाही केला. पुण्यातील वडगाव शेरी येथील एका 23 वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या तरुणीला धमकावण्यात आले. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.