JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / कोल्ड ड्रिंक्स, कूलर आणि चांगलं जेवण; बलात्काराच्या आरोपीला पोलिसांकडून VVIP ट्रिटमेंट

कोल्ड ड्रिंक्स, कूलर आणि चांगलं जेवण; बलात्काराच्या आरोपीला पोलिसांकडून VVIP ट्रिटमेंट

या जिल्हा रुग्णालयात रस्ते अपघातातील व्यक्तीला साधा बेड उपलब्ध होत नाही. मात्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला मात्र इतक्या सुविधा दिल्या जात आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलंदशहर, 29 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) बुलंदशहरातील जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या रुग्णालयात बलात्काराच्या आरोपीला चक्क VIP ट्रिटमेंट दिली जात आहे. एकीकडे जेथे अपघातात जखमी रुग्णांना साधं बेड उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे बलात्काराच्या आरोपीला चक्क बेड, कुलरसारख्या सुविधा दिल्या जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्याम बिहारी नावाच्या एका व्यक्तीवर अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तीन महिन्यांपूर्वी या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी श्याम बिहारी यांना अटक केली. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगातही करण्यात आली. मात्र तुरुंगात गेल्यावर श्याम बिहारीला श्वास घेण्याच त्रास होत असल्याचं कारण सांगून त्याला तुरुंग प्रशासनाने सोमवारी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. येथे एका प्रायव्हेट वॉर्डात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे जेल मॅन्युअलमधील नियमांना बगल देत आरोपीला खाणे आणि राहण्याची सर्व सुविधा पुरविण्यात आली आहे. ही बाब मीडियामध्ये आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने श्याम बिहारीला दिल्लीला रेफर केलं आहे. या सर्व प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी सांगितलं की, मीडियामध्ये या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता अधिक तपास केला जात आहे. हे ही वाचा- आदिवासी तरुणाला ‘तालिबानी’ शिक्षा; पिकअपला बांधून फरफटत नेलं, मृत्यूनंतर खळबळ रुग्णालयाने सांगितलं, ऑक्सिजन कमी असल्याने दिल्लीला हलवलं एकीकडे बलात्काराच्या आरोपीला प्रायव्हेट वॉर्डसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. तर दुसरीकडे रस्ते अपघातातील रुग्णांना साधा बेडदेखील उपलब्ध करून दिला जात नसल्याचा आरोप केला जात आहे. मात्र आरोपीच्या सुरक्षेसाठी तैनात शिपायाने vip ट्रिटमेंट दिले जात असल्याबाबत नकार दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या