पुणे, 24 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराची संतापजनक घटना निगडीमधून समोर आली आहे. 4 तरुणांनी एका तरुणीचा पाठलाग करून तिच्या तोंडामध्ये मिरची पावडर कोंबली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीतर तिच्या कपड्यांवर आणि गुप्तांगावर दारू ओतून ब्लेडने हातावर वार केले. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी पुण्यातील निगडी परिसरातील गंगानगर इथं दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, असं वृत्त दिव्य मराठीने दिलं आहे. पीडित तरुणीच्या बहिणीने गुरुवारी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपी चेतन मारुती घाडगेसह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चेतनला अटक केली आहे. (वादाचं रुपांतर भयानक घटनेत; पुण्यात पत्नीची हत्या करुन पतीनेही उचललं टोकाचं पाऊल) 27 वर्षीय पीडित तरुणी गुरुवारी गुरुदेवनगर येथील बेल्हेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन घरी येत होती. वाटेमध्ये ती एका फेरीवाल्याजवळ कणीस घेण्यासाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी चेतन घाटगे आणि त्याचा साथीदारांनी पीडितेला कोयत्याने वार करण्याची धमकी दिली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पीडित घटनास्थळावरून निघून गेली. त्यानंतर आरोपी चेतन आणि त्याच्या साथीदारांनी तिचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे ही तरुणीने जीव वाचवण्यासाठी एका शौचालयामध्ये आसरा घेतला. पण पाठलाग करणारे तरुण हे सुद्धा सार्वजनिक शौचालयामध्ये घुसले आणि पीडितेला मारहाण केली. तिच्या अंगावर आणि गुप्तांगावर दारू ओतली. एवढंच नाहीतर या नराधमांनी तिला मिरची पावडर खाऊ घातली आणि हातावर ब्लेडने वार करून पळ काढला. (चोर नग्न अवस्थेत अंगाला तेल लावून रस्त्यावर फिरायचा, मुंबई पोलिसांनी ठेचल्या नांग्या) या संतापजनक घटनेनंतर पीडितेच्या बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता आरोपी चेतन घाटगेला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहे.