10 वीच्या मुलीसोबत धक्कादायक कांड
संतोष कुमार गुप्ता, प्रतिनिधी छपरा : तोंड उघडलंस तर जीव घेईन अशी धमकी देऊन दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला फरफटत नेलं आणि तिच्यासोबत भयंकर कृत्य केलं. ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दहावीत शिकणारी पीडित विद्यार्थिनी कामासाठी घराबाहेर पडली तेव्हा आरोपीने तिला गाठलं अन् फरफटत नेलं. तिला कुणाला बोलशील तर जीवाला मुकशील अशी धमकी दिली अन् बलात्कार केला. त्यानंतर मारहाण देखील केली. पीडितेनं घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला आणि पोलीस ठाणं गाठलं. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
छपराच्या सोनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधम तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा तरुण तरुणीची छेड काढत होता. शाळेत जात असतानाही तो मुलीची छेड काढायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली.
फेसबुक लाईव्ह करत गळफास घेतला अन् पत्नीला आणि वडिलांना निरोप देत म्हणाला…आरोपीने एकट्या मुलीला पाहून निर्जन परिसरात फरफटत नेलं तिच्यावर जबरदस्ती केली. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी तरुणाला अटक केली. पीडितेनं विरोध केल्यानं तिला जबरदस्त मारहाण करण्यात आली आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तप जीव घेण्याची धमकी दिली.
बहिणीकडे का बघतो? म्हणत जबर मारहाण, हिंगोलीत तरुणासोबत भयंकर घडलंया प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करत आहेत. पीडितेला रुग्णालयात चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणी कारवाई केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.