JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / क्रूरतेचा कळस! मामाकडे जायचं नाही म्हणत मुलाने आईच्या छातीवर तब्बल 83 वेळा चाकू मारला अन्

क्रूरतेचा कळस! मामाकडे जायचं नाही म्हणत मुलाने आईच्या छातीवर तब्बल 83 वेळा चाकू मारला अन्

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  भिलवाडा येथे किरकोळ कारणावरून आपल्याच आईची निर्घृण हत्या केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राहुल कौशिक (भिलवाडा), 29 एप्रिल : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  भिलवाडा येथे किरकोळ कारणावरून आपल्याच आईची निर्घृण हत्या केली. आईला मारताना मुलाने तिच्या शरिरावर तब्बल 83 वार केल्याची माहिती समोर आली आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या मुलाला अटक केली आहे. ही महिला पुर शहरातील विश्नोई परिसरात राहायची. शंकरलाल विश्वई यांच्या पत्नी मंजू (55) असे तिचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजूला तिच्या भावाच्या लग्नासाठी माहेरी जायचे होते. मुलगा सुनील (19) याने तीला माहेरी जाण्यापासून रोखले. यानंतरही मंजूने भावाच्या घरी जाण्याचा निर्धार केला. मंजूचा मुलगा सुनील याला राग आल्याने तो आईशी जोरजोरात भांडू लागला. त्याला राग अनावर झाल्याने चाकू घेऊन थेट आईवर 83 वार केले. यावेळी आई मंजूचा जागीच मृत्यू झाला.

धक्कादायक! पुण्यात सहावीतली विद्यार्थीनी गरोदर, पोटात दुखतंय म्हणून गेली होती दवाखान्यात

संबंधित बातम्या

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी मुलगा सुनील याला अवघ्या काही तासात अटक केली. याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ही घटना पुर शहरातील विश्नोई परिसरात घडली. मंजू (55) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून, मंजूचा मुलगा सुनील याला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जाहिरात
पत्नी माहेरी गेली म्हणून मुलांना दिली भयानक शिक्षा, निर्दयी बापाच्या कृत्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

घटनेच्या वेळी मंजूचा पती शंकरलाल विश्नोई बाजारात गेला होता आणि तिची सासू घराबाहेर बसली होती. मंजूचा भाऊ विनोद विश्नोई याने सुनीलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रागाच्या भरात आरोपीने आपल्याच आईवर 83 वेळा हल्ला केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या