JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / भाऊ म्हणाला, त्याला भेटू नको, पण तिने ऐकलं नाही, अखेर बहिणीसोबत घडलं खतरनाक कांड!

भाऊ म्हणाला, त्याला भेटू नको, पण तिने ऐकलं नाही, अखेर बहिणीसोबत घडलं खतरनाक कांड!

एका तरुणीचे गावातीलच तरुणाशी प्रेमसंबंध होते.

जाहिरात

प्रेमप्रकरणातून बहिणीची हत्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अभिषेक उपाध्याय, प्रतिनिधी आजमगढ, 29 मे : आत्तापर्यंत तुम्ही भाऊला चित्रपट, मालिकांमध्ये बहिणीच्या प्रेमाचा शत्रू बनताना पाहिलं आणि ऐकलं असेल, पण खऱ्या आयुष्यात अशीच एक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये घडली. येथे एका भावाने बहिणीच्या प्रेमप्रकरणाचा राग येऊन तिची हत्या केली. आझमगढ जिल्ह्यातील रौनापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर कुकरौची गावातील ही घटना आहे. प्रेमाचा शत्रू बनून तरुणाने बहिणीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. तसेच बहिणीची हत्या केल्यानंतर आरोपी भाऊ फरार झाला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण - सिंधू नावाच्या मुलीचे गावातील एका मुलासोबत काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोन्ही जण एकमेकांना गुपचूप भेटू लागले. ही गोष्ट हळूहळू गावात पसरली. हा सगळा प्रकार सिंधूचा भाऊ प्रमोद यादव याच्या लक्षात येताच त्याने बहिणीला त्या मुलाला भेटण्यास मनाई केली. मात्र, तिने त्याचे ऐकले नाही आणि यानंतरही ती आपल्या प्रियकराला भेटत राहिली. यावरून रात्री उशिरा भाऊ-बहिणीत जोरदार वाद झाला. त्या दोघांमध्ये भांडण इतके वाढले की, संतापलेल्या प्रमोदने घरात ठेवलेल्या कुऱ्हाडीने सिंधूच्या डोक्यावर व चेहऱ्यावर अनेक वार केले. यात बहीण सिंधूचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी भाऊ घरातून पळून गेला. त्यानंतर मृताचे वडील रामकुंवर यादव यांनी रौनपार पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस अधीक्षक (गुन्हे) संजय कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपी भाऊ प्रमोद यादव याला अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या