प्रतिकात्मक फोटो
गोपालगंज, 6 मार्च : देशात प्रेमप्रकरणांतून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातच आता यूपीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच बेशुद्ध पडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. तेथे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. राहुल कुमार असे आरोपीचे नाव आहे. तो पश्चिम चंपारण (बेतिया) येथील बगहा पोलीस ठाणे हद्दीच्या मच्छरगाव येथील रहिवासी आहे. त्याचबरोबर पीडितेवर उपचार केल्यानंतर महिला पोलिस कलम-164 नुसार कोर्टात जबाब नोंदवणार आहेत. सध्या या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी दोघांच्याही नातेवाईकांना घटनेची माहिती देऊन पोलीस ठाण्यात बोलावले आहे. जानेवारीमध्ये झाली दोघांची ओळख - जानेवारी महिन्यात कप्तानगंजमधील 21 वर्षीय तरुणी लखनऊमध्ये एका सत्संगाला गेली होती. तिथे तिची राहुल नावाच्या तरुणाशी भेट झाली आणि दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. संवादादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. तरुणाने तिला यानंतर दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. तरुणाच्या फोनवरून तरुणी ट्रेनमध्ये भेटण्यासाठी गोपालगंजला पोहोचली. येथे आल्यानंतर बेतिया येथील तरुणही तेथे पोहोचला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. प्रियकरच प्रेयसीला घेऊन पोहोचला रुग्णालयात - या घटनेदरम्यान बेशुद्ध पडल्यानंतर तरुणीला शनिवारी रात्री उशिरा सदर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माहितीवरून पोलीसही पोहोचले आणि प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले. या प्रकरणी एफआयआर नोंदवून मुलीचा जबाब घेतला जाईल, त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 13 वर्षाच्या मुलासोबत शारिरीक संबंध, 31 वर्षांची महिला गर्भवती, पण, तुरुंगवास नाही होणार थावे जंक्शनवर पोहोचलेल्या तरुणी स्टेशन रोडवर राहणारा प्रियकराचा मित्र आयुष कुमार याच्याशी फोनवर बोलली. आयुष या तरुणीला घ्यायला स्टेशनवर गेला. त्यानंतर तिचा प्रियकर राहुलजवळ त्याला सोडले. दोघेही शनिवारी जंगलात फिरले, त्यानंतर रात्री मित्राच्या अड्ड्यावर गेले. तिथे त्याने आपल्या प्रेयसीवर बलात्कार केला.