JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / साताऱ्यात पैशाच्या हव्यासापोटी एक वर्षाची मुलगी ठेवणी गहाण; हायकोर्टाने फटकारलं

साताऱ्यात पैशाच्या हव्यासापोटी एक वर्षाची मुलगी ठेवणी गहाण; हायकोर्टाने फटकारलं

Mumbai News: एका महिलेने कर्ज घेण्याच्या बदल्यात आपल्या मुलीला तारण ठेवल्याची घटना घडली होती.

जाहिरात

एक वर्षाची मुलगी ठेवणी गहाण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी : एका महिलेने कर्ज घेण्याच्या बदल्यात आपल्या चिमुरडीलाच तारण ठेवल्याची घटना साताऱ्यात घडली होती. धक्कादायक म्हणजे कर्जाची परतफेड केल्यानंतर तारण ठेवलेल्या मुलीला परत करण्यास पैसे देणाऱ्यांनी नकार दिला. यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित महिलेला अटक करण्यात आली. या घटनेतील आरोपी महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यावेळी एकविसाव्या शतकातही मुलींचा वापर वस्तू म्हणून आणि आर्थिक फायद्यासाठी साधन म्हणून केला जात असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. फिर्यादीनुसार, या प्रकरणातील आरोपी बाबर आणि तिच्या पतीने मुलीच्या आईला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात एक वर्षाची मुलगी विकत घेतली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्रात सातारा पोलिसांनी अटक केलेल्या 45 वर्षीय अश्विनी बाबर हिच्या जामीन अर्जावर 8 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती एस.एम.मोडक यांच्या एकल खंडपीठाने म्हटले आहे की, ‘नैतिकता आणि मानवी हक्कांची तत्त्वे’ या संदर्भात हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. जिथे एका वर्षाच्या मुलीला तिच्या जन्मदात्या आईने “विकले” होते. कोर्टाने बाबरला 25 हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला. खटल्याची सुनावणी लवकर सुरू होणार नसल्याने तिला तुरुंगात ठेवण्याची गरज नाही. तिला स्वतःची दोन लहान मुले असून त्यांच्या कल्याणाचाही विचार करणे आवश्यक आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने जामीन देताना केली. वाचा - साहिलच्या लग्नाचा फोटो समोर, घटनेनंतर फोनचा डेटा डिलीट, निक्कीच्या हत्येची Inside Story न्यायालयाने फटकारले कर्जाची परतफेड करूनही आरोपी दाम्पत्याने मुलीला परत करण्यास नकार दिल्याने मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. नंतर, मुलीला तिच्या आईकडे परत करण्यात आले. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘आपण 21व्या शतकात आहोत, अजूनही अशा घटना घडत आहेत ज्यात मुलींना वस्तू समजून त्यांचा आर्थिक फायद्यासाठी वापर केला जातो.’

न्यायालयाने म्हटले, ‘विकणे’ हा शब्द वापरणे अत्यंत क्लेशदायक आहे, पण आयुष्यातील कटू सत्य हे आहे की मुलीच्या आईने तिला पैशाच्या हव्यासापोटी विकले होते.’ उच्च न्यायालयाने म्हटले, “त्यांनी (आरोपींनी) मानवतेविरुद्ध पाप केले आहे आणि नंतर मुलीचा ताबा घेण्यापर्यंत मजल मारली. आईने कर्जाची परतफेड केल्यानंतरही त्यांनी मुलगी परत करण्यास नकार दिला.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या