प्रातिनिधिक फोटो
अमेठी, 18 मार्च : देशभरासह उत्तर प्रदेशातील होळी ( Holi 2022) धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. मात्र अमेठीतून (Amethi Crime News) होळीच्या दिवशी धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामो पोलीस ठाणे हद्दीतील रेवडापूर गावात शुक्रवारी धुळवड खेळण्यावरुन छोट्याशा वादानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या वादात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य 6 जणं जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना लखनऊच्या ट्रामा सेंटरमध्ये रेफर करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवडापूर गावात होळी खेळण्यावरुन दोन पक्षांमध्ये झालेल्या वादात गावातील निवासी अखंड प्रताप सिंह (32) आणि रेवडापुरचे निवासी शिवराम ऊर्फ क्लडडू पासी (55) याचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, यात 6 जणं जखमी झाले आहेत. अखंड प्रताप सिंह याचा गुन्हेरारी इतिहास आहे. दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. हे ही वाचा- 20 रुपयांच्या बदल्यात मुलीसोबत अमानुष कृत्य; वर्षभरापासून सुरू होता भयावह प्रकार गावाला छावणीचं रूप… या प्रकरणात सूचना मिळताच जिल्हाधिकारी पोलीस टीमसह घटनास्थळी दाखल झाले. इतकच नाही तर संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स तैनात करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे परिसरात दहशत पसरली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक गावात रस्त्याशेजारी होळी खेळत होते. यादरम्यान तेथून जाणाऱ्या रेवडापूर गावातील लोकांना रंग लावला. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये खुनी संघर्ष सुरू झाला. यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजणं जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दोघांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.