Home /News /pune /

पुणे हादरलं! 20 रुपयांच्या बदल्यात अल्पवयीन मुलीसोबत अमानुष कृत्य; 1 वर्षांपासून सुरू होता किळसवाणा प्रकार

पुणे हादरलं! 20 रुपयांच्या बदल्यात अल्पवयीन मुलीसोबत अमानुष कृत्य; 1 वर्षांपासून सुरू होता किळसवाणा प्रकार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Rape on Minor Girl: पुणे जिल्ह्याला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला वीस रुपये देण्याचं आमिष दाखवत (Lure of 20 rs) तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे.

    पुणे, 18 मार्च: मागील काही दिवसांपासून पुण्यासह महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींसह महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात दररोज अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात पुणे (Pune) जिल्ह्याला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला वीस रुपये देण्याचं आमिष दाखवत (Lure of 20 rupees) तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. नराधम आरोपी मागील एक वर्षापासून पीडित मुलीला नरक यातना (rape in minor) देत होता. अखेर या घटनेची माहिती पीडित मुलीच्या आई वडिलांना कळाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आई  वडिलांनी पाटस पोलीस ठाण्यात धाव घेत, फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. मयुर पांडुरंग फडके असं अटक केलेल्या नराधम आरोपीचं नाव असून तो दौंड तालुक्यातील कानगाव येथील रहिवासी आहे. हेही वाचा-टीममधून काढण्याची धमकी देत किळसवाणं कृत्य; क्रीडा शिक्षकाला कठोर शिक्षा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम आरोपी मयुर फडके हा मागील एक वर्षांपासून गावातीलच 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. पीडित मुलीच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन तो पीडितेला वीस रुपये देण्याचं आमिष दाखवायचा. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. मागील एक वर्षांपासून नराधम आरोपी पीडितेला नरक यातना देत होता. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या आई वडिलांना कळाल्यानंतर या धक्कादायक प्रकाराला वाचा फुटली आहे. हेही वाचा-दहावीची परीक्षा द्यायला गेली अन् परतलीच नाही; लेकीच्या विरहात आईचा दुर्दैवी अंत गुन्हा दाखल होताच यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलिसांनी नराधम आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. नराधम आरोपी मागील 1 वर्षांपासून अशाप्रकारे पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत असल्याचं माहिती कळताच गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Rape on minor

    पुढील बातम्या