JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / पतीच्या मृत्यूची एकमेव साक्षीदार; पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल, असं काय घडलं

पतीच्या मृत्यूची एकमेव साक्षीदार; पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल, असं काय घडलं

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील थलांजू गावात भजन म्हणणारे गायक ओम मुंडेल यांच्या कारच्या मागच्या दोन दिवसापूर्वी अपघात झाला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

महेंद्र बिष्णोई, (नागौर), 08 एप्रिल : राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील थलांजू गावात भजन म्हणणारे गायक ओम मुंडेल यांच्या कारच्या मागच्या दोन दिवसापूर्वी अपघात झाला होता. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. थलांजू गावचा रहिवासी असलेल्या मुकुनाराम यांचा यामध्ये मृत्यू झाला. अपघातानंतर दोन दिवसांनी मुकनारामची 20 वर्षीय पत्नी पूजा हिनेही आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मुकनाराम आणि पूजा यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. पूजा चौथ्यांदाच तिच्या सासरच्या घरी थलांजूला आली होती. जिथे मुकनाराम हे पुजासोबत बाईकवरून एका सामाजिक कार्यक्रमाला गेले होते. वाटेत सिंगड गावाजवळ भजन गायक ओम मुंडेल यांच्या वाहनाला धडकून मुकुनाराम मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूने पूजाला इतका धक्का बसला की तिने मोठ्या खड्ड्यात उडी घेत आत्महत्या केली.

इंडिगोच्या विमानात मद्यधुंद प्रवाशाचा गोंधळ; प्रवासात किळसवाणे कृत्याने खळबळ

संबंधित बातम्या

नायरा पेट्रोल पंपाजवळ चुकीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी कारने मुकुनाराम यांच्या दुचाकीला धडक दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी मुकुनाराम आणि पूजाला रुग्णालयात नेले, यादरम्यान मुकुनारामचा मृत्यू झाला, तर पूजा जखमी झाली होती. पतीच्या निधनाने पुजाला आधार राहिला नव्हता यामुळे तीने थेट आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात

मुकनारामच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी व कुटुंबीयांनी अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनीही तत्परता दाखवली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आलिशान कारची ओळख पटली आहे. हे वाहन भजन गायक ओम मुंडेल यांच्या नावावर असून, पोलिसांनी वाहन जप्त केले असून चालक मुकेशला अटक केली आहे.  

‘मला आता या जगात…’, असं म्हणत मुलाने उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक कारण समोर
जाहिरात

या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांसमोर आरोप करत भजन गायक ओम मुंडेल आपल्या साथीदारांसह कारमधून जात होते, जखमींना रुग्णालयात नेण्याऐवजी त्यांनी तिथून पळ काढला. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या