भोपाळ, 27 नोव्हेंबर : दिवंगत संत आणि अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज (Bhaiyyu maharaj) यांच्या आत्महत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. भय्यू महाराज यांना पलक (Palak) नावाची तरुणी अश्लील व्हिडीओ (obscene videos) शेअर करण्याची धमकी देऊन वारंवार त्रास द्यायची. तिच्या त्रासाला कंटाळून भय्यू महाराजांनी आत्महत्येसारखं (Suicide) टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी भोपाळच्या फॉरेन्सिक टीमने शुक्रवारी (26 नोव्हेंबर) कोर्टात 109 पानी व्हाट्सअॅप चॅटींग सादर केलं आहे. त्यामध्ये अनेक तथ्य असल्याचा दावा केला जातोय. फॉरेन्सिक टीमने कोर्टात सादर केलेल्या अहवालात पलक पीयूष जीजू नावाच्या व्यक्तीसोबत चॅटद्वारे संभाषण करते. त्यातून काही तथ्य समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भय्यू महाराज यांची आत्महत्या हे खूप मोठं षडयंत्र होतं, असं उघड झालं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पलक हिला याआधीच अटक केली आहे. पलकने आश्रमातील दोन सेवकांच्या मदतीने भय्यू महाराजांचा छळ केला. त्यातून त्यांनी आत्महत्या केली, असा दावा आता कोर्टात करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण हे सध्या कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.
पोलिसांनी आरोपी पलक हिच्यासह आणखी काहीजणांना अटक केली होती. तसेच सर्व आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी अटकेतील सर्व आरोपींच्या मोबाईल चॅटिंगचा डेटा रिकव्हर केला. त्यातून जी माहिती समोर आली ते पाहून पोलीसही चक्रावले. आरोपी चॅटिंग करताना भय्यू महाराज यांचा BM या कोडवर्डने उल्लेख करायचे. विशेष म्हणजे एका चॅटमध्ये आरोपीने ‘BM ला वेडं करण्यासाठी घरी बसवायचं आहे. त्यासाठी मांत्रिकासोबत 25 लाखांचं डीलदेखील झालंय’, असा उल्लेख केला आहे. तसेच चॅटमध्ये भय्यू महाराजांच्या पत्नी आयुषी आणि मुलगी कुहू हिचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. हेही वाचा : अर्जुन खोतकरांच्या मागे दुसऱ्या दिवशीही ईडीचा ससेमिरा, अडचणी वाढणार?
पलक : …आयुषीने मोठा मांत्रिक पकडला आहे. 25 लाखांचं डीलही झालंय. पीयूष जीजू : कुणासोबत? पलक : मांत्रिकासोबत पलक : BM ला वेडं करुन घरी बसवायचं आहे. पीयूष जीजू : कुहू घरी येणार आहे. उद्या कुहूचा रुम स्वच्छ केला जाईल. पलक : कुहूने शरदला म्हटलंय की ती जर समोर आली तर मारुन टाकेन पलक : आयुषीने येऊन परत काम खराब केलं पलक : आयुषीने वैनी आणि कुहूचे फोटो जाळून टाकले
दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि शरद यांना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पलकने भय्यू महाराजांसोबत अश्लील व्हिडीओ बनवले होते. ती या सेवकांच्या मार्फत भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करायची. तसेच तिने भय्यू महाराजांवर लग्नासाठी देखील दबाव केला होता. पण त्यांनी आयुषीसोबत लग्न केलं होतं. हेही वाचा : पत्नी ‘हनी’ आणि नवऱ्याने केलं ट्रॅप; कोल्हापुरातील व्यावसायिकाला लाखोंचा गंडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पलक पुराणिक, विनायक दुधाले आणि शरद देशमुख यांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली होती. हे तीनही आरोपी महाराजांची संपत्ती हडपण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी त्यांनी मोठं षडयंत्र रचलं होतं. त्याच माध्यमातून त्यांनी भय्यू महाराज आणि पलक यांचे अनेक अश्लील फोटो बनवले होते. तेच फोटो दाखवून भय्यू महाराजांना धमकी दिली जायची. त्यामुळे भय्यू महाराज प्रचंड खचले. अखेर त्यांनी नैराश्यात जावून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पलक एवढी खतरनाक होती की तिने भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करुन आश्रमच्या तिजोरी आणि दानपेटीवर ताबा मिळवला होता. एवढंच नाही तर तिने भय्यू महाराजांच्या घराच्या किल्ल्या देखील आपल्या हातात घेतल्या होत्या. ती सर्वांसमोर स्वत:ला भय्यू महाराजांची मुलगी असल्याचं भासवायची. पण वास्तव्यात ती भय्यू यांच्यासोबत प्रेयसी असल्यासारखं वागायची. ती आणि विनायक दर महिन्याला भय्यू महाराजांकडून दीड लाख रुपये वसूल करायचे.