JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य, अंगावर काटा आणणारी घटना

आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य, अंगावर काटा आणणारी घटना

आईला बेशुद्ध करून चिमुकलीची हत्या केल्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात

dhruvanshi

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 21 मार्च : नाशिकमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातल्या गंगापूर रोड धृवनगर परिसरात ही घटना घडली. आईला बेशुद्ध करून चिमुकलीची हत्या केल्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गंगापूर सातपूर लिंक रोड इथे धृवनगर परिसरात भूषण रोकडे हे पत्नी, आई आणि तीन महिन्यांची चिमुकली धृवांशीसोबत राहतात. भूषण रोकडे सातपूरमधील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे भूषण कामावार गेल्यानंतर घरी त्यांची आई आणि पत्नी दोघीच होत्या. संपकाळात आरोग्यसेवा बिघडली, नागपुरात मेयो-मेडिकलमध्ये 6 दिवसात 109 मृत्यू आई सांयकाळी दूध आणालया गेली असताना भूषण यांची पत्नी आणि चिमुकली घरी होत्या. यावेळ एक पंजाबी ड्रेस घातलेली महिला घरात घुसली. तिने धृवांशीच्या आईच्या नाकाला रूमाल लावला. ती बेशुद्ध होताच तीन महिन्यांच्या निरागस धृवांशीची गळा चिरून हत्या केली. भूषण यांची आई दूध घरी घेऊन आल्यानंतर सून बेशुद्धावस्थेत असल्याचं पाहिलं. तर नात धृवांशी रक्ताच्या थारोळ्यात दिसली. या घटनेची माहिती त्यांनी शेजाऱ्यांना दिली. धृवांशी आणि तिच्या आईला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचाराआधीच धृवांशीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं. हत्येच्या कारणाचा शोध पोलिस घेत आहेत. मुलीच्या आईने एका महिलेवर संशय व्यक्त केला आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस तपास करत होते. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या