JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पुणे : शाळेच्या आवारातच थरारक घटना; दहावीतील मुलाचा विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

पुणे : शाळेच्या आवारातच थरारक घटना; दहावीतील मुलाचा विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

दहावीच्या मुलाने जुना वाद डोक्यात ठेवून हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना घडल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमित राय, पुणे 29 सप्टेंबर : मोबाईल, टीव्ही, सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे अल्पवयीन मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. अनेकदा यातील काही सीन पाहून मुलंही त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयातून. इथे शिकणाऱ्या एका दहावीतील विद्यार्थ्याने नववीमध्ये शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने वार केले. ही घटना शाळेच्या आवारात घडल्याने एकच खळबळ उडाली. बुलढाण्यातले शातिर चोर, ज्वेलर्सच्या दुकानात भामट्यांचा हात, पाहा VIDEO दहावीच्या मुलाने जुना वाद डोक्यात ठेवून हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना घडल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. कुणाल विकास कराळे ( वय 15 ) असं जखमी झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो नववीमध्ये शिकत आहे. या मुलाच्या डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल कराळे आणि इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलाचा एक महिन्यापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. मात्र, त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी तो वाद मिटविला होता. मात्र दहावीतील मुलाने खुन्नस डोक्यात ठेवून बुधवारी कोयता शाळेत आणला. यानंतर कुणाल हा पुढे जात असताना शाळेच्या मैदानातच पाठीमागून कोयत्याने तीन ते चार वार केले. यात कुणालच्या हाताच्या बोटांना आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. पालघरमध्ये भरदिवसा तरुणीवर गोळीबार, टिमा हॉस्पिटलजवळ भयानक रक्तपात याबाबत शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना माहिती देत जखमी कुणालला ताबडतोब मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केलं. घटनेची माहिती मंचर पोलिसांना मिळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पोलीस याप्रकरणात लवकरच योग्य ती कारवाई करतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या