JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लग्नानंतर 2 आठवड्यातच नवरी 3 मुलांची आई असल्याचं समजलं; संपूर्ण सत्य जाणून पती शॉक

लग्नानंतर 2 आठवड्यातच नवरी 3 मुलांची आई असल्याचं समजलं; संपूर्ण सत्य जाणून पती शॉक

सुरेश गगनदीपसोबत राहू लागला. मात्र लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांतच गगनदीप घरातून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि 75000 रुपये रोख घेऊन फरार झाली.

जाहिरात

(प्रातिनिधीक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर 06 जून : लग्न हा जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा आणि खास क्षण असतो. या दिवसापासून माणसाचं आयुष्य पूर्णपणे बदलतं, असं म्हटलं जातं. मात्र काही घटना अतिशय अजब असतात. सध्या अशीच एक घटना राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून समोर आली आहे. यात एका बनावट आणि लुटणाऱ्या नववधूने लग्नाच्या नावाखाली तरुणाची फसवणूक (Marriage Fraud) केली. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत तिला भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या श्रीगंगानगर जिल्ह्यातून अटक केली. हे प्रकरण सीकर जिल्ह्यातील दादिया पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. ही नवरी लग्नाच्या 12 दिवसानंतरच पतीच्या घरातून 16 तोळे सोनं आणि 75000 रुपये रोख घेऊन पळून गेली. ही महिला आधीच तीन मुलांची आई असल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलीस तिची अधिक चौकशी करत आहेत. पैशासाठी पत्नीने पार केली हद्द! पतीला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हायरल केला स्वतःचाच अश्लील व्हिडिओ, आता… दादियाचे एसएचओ विजेंद्र सिंह यांनी सांगितलं की, पिपराली भागातील सुरेश कुमार शर्मा यांनी या संदर्भात २९ मे रोजी तक्रार नोंदवली होती. या अहवालावरून पोलिसांनी नववधू गगनदीपला अटक केली. ती श्रीगंगानगर येथील रहिवासी आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, सुरेशने 15 मे रोजी दलालामार्फत गगनदीपशी लग्न केलं होतं. त्याबदल्यात दलालांनी खात्यात ५३ हजार रुपये जमा करून घेतले आणि नंतर 23 हजार रुपये रोख घेतले. त्यानंतर सुरेश गगनदीपसोबत राहू लागला. मात्र लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांतच गगनदीप घरातून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि 75000 रुपये रोख घेऊन फरार झाली. सुरेशच्या अहवालावरून पोलिसांनी एक पथक तयार करून तिचा शोध सुरू केला. दरम्यान, गगनदीप श्रीगंगानगरला जाणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. एकाच महिलेवर जडले दोघांचे प्रेम, चाकूने वार करून मित्राने मित्राला संपवलं, अमरावतीतील घटना त्यावर पोलिसांनी श्रीगंगानगरच्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून वधूचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवला. या फोटोच्या माध्यमातून पोलिसांनी गगनदीनला श्रीगंगानगर येथून पकडलं. त्यानंतर तिला दादिया येथे आणून चौकशी करण्यात आली. चौकशीत समोर आलं की गगनदीप विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. पोलीस गगनदीपची चौकशी करण्यात व्यस्त आहेत. गगनदीपच्या माध्यमातून दलालांपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. चौकशीदरम्यान आणखी काही घटना उघड होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या