JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 10 हजाराच्या उधारीसाठी मित्र मित्राच्या जीवावर उठला, यवतमाळमधील भयंकर घटना

10 हजाराच्या उधारीसाठी मित्र मित्राच्या जीवावर उठला, यवतमाळमधील भयंकर घटना

आकाश भोयर याने 1 वर्षांपूर्वी संदीपकडून 10 हजार घेतले होते. पण वर्ष उलटले तरी आकाशने पैसे काही परत केले नाही

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नरेंद्र मते, प्रतिनिधी यवतमाळ, 14 डिसेंबर : उधारीच्या पैशासाठी एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमध्ये मित्र गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शंकरपूर इथं ही घटना घडली. आकाश भोयर असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी मित्र संदीप वंजारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nanded Student Suicide : आदिवासी आश्रम शाळेतील 10 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या, नांदेड हादरलं) आकाश भोयर याने 1 वर्षांपूर्वी संदीपकडून 10 हजार घेतले होते. पण वर्ष उलटले तरी आकाशने पैसे काही परत केले नाही. उसणे पैसे ते परत का करत नाही म्हणून संदीप ने आकाशला शेत शिवाराजवळ बोलावून घेतले होते. त्यावेळी संदीपने आकाशला दारू पाजली. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा एकदा उधारीच्या पैशावरून वाद झाला. रागाच्या भरात संदीपने आकाशच्या अंगावर गाडीतील पेट्रोल काढून ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. (कपडे स्वच्छ करण्याच्या नादात प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा; धुळ्यातील तरुणाचा भयानक मृत्यू!) यामध्ये आकाश हा 50 टक्के भाजला असून त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. न्यायालयाच्या आवारात आरोपीवर फिर्यादी महिलेचा कटरने हल्ला दरम्यान, यवतमाळमध्ये न्यायालयाच्या आवारामध्ये एका आरोपीवर महिलेनं कटरने हल्ला केल्याची घटना घडली आहे. विशाल शेंडे असे जखमींचे नाव आहे. विशाल शेंडे हा एका महिलेवरील अत्याचार प्रकरणात आरोपी आहे. आज विशालची हजेरी न्यायालयात होती यावेळी फिर्यादी महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने आरोपीवर कटरने वार करून हल्ला केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महिलेला ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आवारात झालेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या