JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / आनंदात केलेला गोळीबार दुःखात बदलला; लग्नातच चिमुकलीचा भयानक शेवट, 5 जखमी

आनंदात केलेला गोळीबार दुःखात बदलला; लग्नातच चिमुकलीचा भयानक शेवट, 5 जखमी

वरात वधूच्या घरी पोहोचताच बुधन राय आणि अनिल साव यांनी हर्ष फायरिंग सुरू केली. गोळीबारादरम्यान एक गोळी शिवानीला लागली

जाहिरात

लग्नातील गोळीबारात चिमुकलीचा मृत्यू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 21 मे : लग्नाच्या मंडपातील एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारची राजधानी पाटणाला लागून असलेल्या दानापूर शाहपूरमध्ये काल रात्री लग्न समारंभात जोरदार गोळीबार झाला. ज्यात गोळी लागल्याने सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्याचवेळी यामध्ये पाच जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण दियारा येथील गंगहरा पंचायतीच्या फुटाणी मार्केटशी संबंधित आहे. शिवानी असं मृत तरुणीचं नाव आहे. तिचे वडील उमेश राय यांच्या जबानीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर लोकांनी बुधन राय या शूटरला पकडलं. तर दुसरा आरोपी अनिल साओ घटनास्थळावरून पळून गेला. हृदयद्रावक! 10 दिवसावर आलेलं लग्न पण प्रियकर मनातून गेलाच नाही; तरुणीने सगळंच संपवलं फुटाणी बाजारात हलचल साव यांच्या मुलीच्या लग्नाचा कार्यक्रम होता. उमेशही मुलगी शिवानीसोबत लग्नात सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. वरात वधूच्या घरी पोहोचताच बुधन राय आणि अनिल साव यांनी हर्ष फायरिंग सुरू केली. गोळीबारादरम्यान एक गोळी शिवानीला लागली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. यानंतर एकच खळबळ उडाली. लोक इकडे तिकडे धावू लागले. जखमी मुलीसह 5 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे शिवानीचा मृत्यू झाला. दानापूरचे एएसपी अभिनव धीमान यांनी सांगितलं की, एक आरोपी बुधन याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर अनिलचा शोध सुरू आहे. लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या