प्रतिकात्मक फोटो
पाटणा 09 मार्च : बिहार राज्यात बेगुसरायमध्ये होळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. एका तरुणाने होळीच्या दिवशी दारूच्या नशेत सात वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार केला. तिच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या मुलीच्या गालावरही दाताने चावा घेतला. यामुळे ती मुलगी गंभीर जखमी झाली आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी विवाहित असून त्याला तीन मुलं असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दलचं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. फेरफटका मारण्यासाठी गच्चीवर गेली; थोड्याचवेळात इमारतीखाली आढळला महिलेचा मृतदेह, धक्कादायक घटनेनं मुंबई हादरलं ही घटना होळीच्या दिवशी, बुधवारी (8 मार्च) साहेपूर कमाल पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात घडली. दोन मुली वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. परत येत असताना त्या झोका घेण्यासाठी थांबल्या होत्या. याच ठिकाणी आरोपी तरुण छोटू कुमार त्यांना भेटला. त्याने या दोघींनाही बोलण्यात फसवून गावातल्या शाळेच्या बाथरूममध्ये नेलं. तिथे आरोपी छोटूने 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या गालावर दाताने चावा घेतला. ती जखमी मुलगी त्याच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी ठरली; पण 7 वर्षांची चिमुकली मात्र त्याच्या तावडीत सापडली. आरोपीने त्या लहानशा मुलीबरोबर दुष्कृत्य केले. याचदरम्यान दुसरी अल्पवयीन मुलगी धावत तिच्या घरी पोहोचली आणि त्या घटनेची माहिती दिली. यानंतर, कुटुंबीय आणि गावातले इतर नागरिक शाळेत पोहोचले आणि त्यांना दिसलं, की 7 वर्षांची मुलगी तिथे पडून होती. यानंतर पोलिसांना या घटनेबद्दल माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि थोड्या चौकशीनंतर आरोपी तरुणाला अटक केली. 8 मुलांची आई, अनैतिक संबंध.. नंतर एका वयस्काचा खून, नंतर आरोपीला जे कळलं त्याने तोच हादरला विवाहित आहे आरोपी या प्रकरणात माहिती देताना डीएसपी निशित प्रिया यांनी सांगितलं, की अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि पीडित दोघेही एकाच गावातले आहेत. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपी विवाहित असून त्याला तीन अपत्यं आहेत, अशी माहितीही समोर आली आहे. या प्रकरणात पुढील कारवाई केली जात आहे. दरम्यान, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. आरोपी सध्या अटकेत असून त्याची चौकशी सुरू आहे.