JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / सावधान! घरातील पेस्ट कंट्रोलने घेतला 6 वर्षीय मुलीचा जीव; आई-वडीलही रुग्णालयात दाखल

सावधान! घरातील पेस्ट कंट्रोलने घेतला 6 वर्षीय मुलीचा जीव; आई-वडीलही रुग्णालयात दाखल

कीटकनाशकांनी भरलेलं घर सहा वर्षांच्या निष्पाप मुलीसाठी गॅस चेंबर बनलं. सोमवारी सकाळी आई-वडिलांसोबत केरळला भेट देऊन ती घरी परतली होती. मात्र काही वेळातच..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 04 ऑगस्ट : कीटकनाशकांनी भरलेलं घर सहा वर्षांच्या निष्पाप मुलीसाठी गॅस चेंबर बनलं. सोमवारी सकाळी आई-वडिलांसोबत केरळला भेट देऊन ती घरी परतली होती. काही वेळाने जेव्हा ती आई-वडिलांसोबत झोपायला जात होती, तेव्हा तिचा घसा खवखवायला सुरुवात झाली आणि खाज सुटू लागली. याबाबत तिने पालकांना सांगितल्यावर आम्हालाही असंच होतं असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांना खाजवत होतं आणि शरीरात काहीतरी टोचल्यासारखं वाटत होतं. यानंतर सर्वांना उलटी होऊ लागली. साडेअकरा वाजताच्या सुमारास तिघेही शेजारीच असलेल्या रुग्णालयात दाखल झाले. मात्र, दुपारपर्यंत या चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला आणि घरातील एकुलती एक मुलगी आई-वडिलांनी गमावली. मुलीचे वडिलही बराच वेळ बेशुद्धच राहिले. नक्की काय झालं, हे कोणालाच समजत नव्हतं. Crime News: अल्पवयीन मुलांची 25 लाखांसाठी अपहरण करुन हत्या, मित्रांनीच केला घात TOI च्या बातमीनुसार, नंतर मुलीच्या मावशीने सर्व गोष्टी सांगितल्या. एमबीए पदवीधर विनोद कुमार बंगळुरूमधील एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करतात. पत्नी निशा आणि मुलगी आहानासोबत ते नुकतंच केरळहून परतले होते. 28 जुलै रोजी ते केरळला गेले होते. याआधी त्यांनी घरमालकाकडे घरात झुरळ आणि किडे असल्याची तक्रार केली होती आणि कीटकनाशक फवारणी करण्यास सांगितलं होतं. याच कारणामुळे ते आपल्या कुटुंबीयांसह केरळला गेले होते. घरमालकानेही होकार दिला. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. घरातील कीटकनाशकांच्या वापरानेच चिमुरडीचा जीव घेतला. दोन्ही पालक अजूनही धक्क्यात आहेत. भादंवि 304A आणि 337 अंतर्गत घरमालकावर निष्काळजीपणा आणि जीवितहानी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. घरमालकाने सांगितलं की, त्याच्या घरात जे रसायन होतं तेच रसायन त्याने वापरले. अंगात देवी आल्याचं दाखवून तलवारीने छोट्या बहिणीचं शिर धडापासून केलं वेगळं; वडील-काकांवरही हल्ला हे रसायन 100 रुपयांना 100 मिली मिळतं. हे रसायन सामान्यतः कापूस, भात, तेलबिया किंवा इतर लागवडीच्या पिकांमधून बोंडअळी, सुरवंट, लीफमिनर यांसारखे कीटक काढून टाकण्यासाठी वापरले जाते. घरमालकाने जाणूनबुजून निष्काळजीपणा तर केला नाही ना, याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय विनोद कुमार यांना पेस्ट कंट्रोलनंतर किती दिवस घराबाहेर राहावे लागेल याची माहिती देण्यात आली होती का, याचाही शोध घेतला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या