JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! परीक्षेत नापास झाल्याने शिक्षकाने दिली क्रूर शिक्षा; पाचवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

धक्कादायक! परीक्षेत नापास झाल्याने शिक्षकाने दिली क्रूर शिक्षा; पाचवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

शिक्षकाच्या मारहाणीमुळे एका निष्पाप विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 10 ऑक्टोबर : आपल्याला ज्ञान देणारे गुरू म्हणजेच शिक्षक हे नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे असतात. मात्र, अनेकदा हे शिक्षकच असं काही करतात, जे सगळ्यांनाच हादरवणारं असतं. अशीच एक घटना आता ग्रेटर नोएडामधून समोर आली आहे. यात शिक्षकाच्या मारहाणीमुळे एका निष्पाप विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. आरोपी शिक्षक फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिक्षकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं आहे. मुलाच्या मृत्यूमुळे घरातील सदस्यांची अवस्था बिकट आहे. आरोपी शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हे प्रकरण बादलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंबवाडचे आहे. मुलगी बेपत्ता, 2 वर्षांनी प्रियकराच्या घरातून सापडली भयंकर अवस्थेत; आई-बाबा हादरले! मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार 7 ऑक्टोबर रोजी बांबवड गावातील एका खासगी शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. काही मुले परीक्षेत नापास झाली. नापास झालेल्या मुलांना शिक्षकाने हातावर काठीने दोनवेळा मारलं. यानंतर काही काळानंतर एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. तो आधीच आजारी होता, असं सांगितलं जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, विद्यार्थ्याच्या प्रकृतीची माहिती शिक्षकाने कुटुंबीयांना फोनवरून दिली होती. विद्यार्थ्याचे कुटुंबीय आणि शिक्षक विद्यार्थ्याला रुग्णालयात घेऊन गेले, तिथून त्याला दिल्लीतील रुग्णालयात रेफर करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. अंडा करीसाठी आईचा जीवच घेतला; आधी डोकं भिंतीवर आपटलं नंतर रॉडने संपवलं माहिती देताना डीसीपी सेंट्रल नोएडा यांनी सांगितले की, आरोपी शिक्षक फरार आहे, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. मुलाच्या आईचे म्हणणे आहे की चाचणीनंतर मुलाला एवढी मारहाण करण्यात आली की त्याला गंभीर दुखापत झाली. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्याला दिल्लीला रेफर करण्यात आले. ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी शिक्षक फरार आहे. शिक्षकाच्या शोधासाठी पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं आहे. मुलाच्या आईचं म्हणणे आहे की चाचणीनंतर मुलाला एवढी मारहाण करण्यात आली की त्याला गंभीर दुखापत झाली. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथून त्याला दिल्लीला रेफर करण्यात आलं. ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या