एवढंच नाहीतर या नराधमांनी पीडितेवर अत्याचार करत असताना व्हिडीओ रेकॉर्ड करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.
मुंबई, 05 डिसेंबर : मुंबईमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच कुर्ला परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नराधमांनी पीडित महिलेल्या घरात घुसून तिच्यावर हल्ला करून अत्याचार केला आणि प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके दिले असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला पूर्व परिसरात ही घटना घडली. पीडित 42 वर्षीय महिलेच्या घरामध्ये तीन नराधम शस्त्रासह घुसले. पीडितेवर आधी धारदार शस्त्राने वार करण्यात आले. तिच्या दोन्ही हातावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यानंतर तिघांनी मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. (पालघर हादरले, 21 वर्षीय नराधमाचा 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; आरोपीला अटक) पीडितेवर अत्याचार करून हे नराधम थांबले नाही. या नराधमांनी पीडितेच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके दिले. एवढंच नाहीतर या नराधमांनी पीडितेवर अत्याचार करत असताना व्हिडीओ रेकॉर्ड करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. (‘त्याने श्रद्धाचे 35 तुकडे केले, मी तुझे 70 करीन..’ धुळ्यातील तरुणाने गर्लफ्रेंडला दिली धमकी, अन् मग…) हे तिन्ही नराधम कुर्ला परिसरातच राहणार आहे. या पीडितेनं आपल्यासोबत घडलेली हकीकत शेजारी राहणाऱ्या लोकांना सांगितलं. एका सामाजिक संस्थेशी संपर्क केल्यानं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शोध घेत आहे.