JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / सिलेंडरपेक्षा मित्राचा जीव झाला 'स्वस्त', कुऱ्हाडीने वार करून मित्रानेच संपवलं, परभणीतील घटना

सिलेंडरपेक्षा मित्राचा जीव झाला 'स्वस्त', कुऱ्हाडीने वार करून मित्रानेच संपवलं, परभणीतील घटना

घरगुती गॅसची टाकी ( gas cylinder) मागणाऱ्या मित्रावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याची हत्या ( gas cylinder) केल्याचा खळबळजनक घटना

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

परभणी, 18 जून : घरगुती गॅसची टाकी ( gas cylinder) मागणाऱ्या मित्रावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याची हत्या ( gas cylinder)  केल्याचा खळबळजनक घटना परभणी शहरातील क्रांतीनगर (krantinagar) भागात घडला आहे. या प्रकरणी मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून आज कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,परभणी शहराला हादरवणारी ही घटना शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या क्रांतीनगर भागात घडली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या भागात राहणाऱ्या शेख जावेद शेख युसूफ याचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्याच भागात राहणाऱ्या आपला मित्र जावेद पठाण याला काही दिवसांपूर्वी शेख जावेद याने, घरगुती गॅसची टाकी वापरासाठी दिली होती. ती परत आणण्यासाठी शेख जावेद हा आरोपीच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याचा मित्र असलेल्या, आरोपी जावेद पठाण यांने, “आता टाकी नाही, नंतर देतो. तुला एकदा सांगितले समजत नाही का ?” असं म्हणून वाद घालायला सुरुवात केली. ( भरभर खाण्याची सवय असेल तर लगेच बदला, अनेक आजारांना आहे निमंत्रण! ) या वादातून त्याने मयत जावेद शेख याला शिवीगाळही केली. त्यात सुरू झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर, हाणामारीत झाले आणि त्यामधूनच आरोपीने, जावेद त्याच्या गळ्यावर आणि डोक्यावर कुऱ्हाडीने वार करायला सुरुवात केली. यात गंभीर जखमी झाल्याने, शेख जावेद याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी जावेद पठाण याने त्या ठिकाणाहून पळ काढला. ( ज्यूस पिणाऱ्यांनो,सडलेल्या फळांचा विकत होते ज्यूस, भिवंडीतला किळसवाणा VIDEO ) घटनेची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याला कळवल्यानंतर, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली आणि पंचनामा करून  मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जावेद याचा शव जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी परभणीच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी जावेद पठाण हा अद्यापही फरार आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या