JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / एकाच घरात आढळले कुटुंबातील चौघांचे मृतदेह; मुंबईतील घटनेनं खळबळ

एकाच घरात आढळले कुटुंबातील चौघांचे मृतदेह; मुंबईतील घटनेनं खळबळ

ही घटना शिवाजी नगरच्या बैंगणवाडी परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार यात पती, पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत (Mumbai Crime).

जाहिरात

या हत्याकांडाने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून इतक्या क्रूरपणे पत्नी पतीची हत्या कशी करू शकते अशी चर्चा रंगत आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 29 जुलै : मुंबईतील शिवाजी नगर भागातील एका घरामध्ये पोलिसांना चार जणांचे मृतदेह आढळले आहेत. ही घटना शिवाजी नगरच्या बैंगणवाडी परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार यात पती, पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आत्महत्येचं प्रकरण असू शकतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. टीव्ही पाहण्याच्या नादात उंदीर मारण्यासाठी ठेवलेलं विषारी टोमॅटो खाल्लं; मुंबईतील महिलेचा मृत्यू दरम्यान दुसऱ्या एका घटनेत मुंबईच्या मालाड येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. यात टीव्ही पाहाण्याचं वेड महिलेच्या जीवावर बेतलं. यात टीव्ही पाहताना झालेल्या हलगर्जीपणामुळे 27 वर्षीय रेखादेवी फुलकुमार निशाद नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. रेखादेवी टीव्ही पाहण्यात इतक्या मग्न झाल्या की त्यांनी उंदीर मारण्यासाठी ज्या टोमॅटोला विशारी औषध लावून ठेवलं होतं, तेच टोमॅटो खाल्लं. मुंबई : एका हातात लेकाचा हात, दुसरीकडे छत्री; तेवढ्यात चोरांनी साधला डाव, धक्कादायक Video सीसीटीव्हीत कैद उंदीर मारण्यासाठी ठेवलेलं हे टोमॅटो खाल्ल्याने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मालवणी पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. रेखादेवी मुंबईतील मालाड परिसरातील पास्कलवाडी, मारवेरोडे मालाड पश्चिम येथे कुटुंबासह राहत होत्या.बातमी अपडेट होत आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या