बागेची देखभाल करणाऱ्यांनी विष देऊन मारलं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
वेद प्रकाश, प्रतिनिधी ऊधम सिंह नगर, 21 जून : एकीकडे वन्यजीवप्रेमी प्राण्यांना वाचवण्यासाठी धडपडतात, तर दुसरीकडे बेभानपणे जनावरांच्या कत्तली केल्या जातात. उत्तराखंडमधून एक अतिशय किळसवाणा प्रकार समोर आला आहे. आंब्याच्या बागेत तब्बल 24 माकडांचे मृतदेह आढळले. एकत्र दफन केलेले एवढ्या मोठ्या संख्येने माकडांचे मृतदेह आढळल्यामुळे पोलिसांनी हा घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे. याप्रकरणी 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऊधम सिंह नगर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेबाबत कळताच स्थानिकांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ज्या जागी माकडांना गाडण्यात आलं होतं. तिथे खोदकाम करून पोलिसांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले आणि काशीपूरच्या राजकीय पशू चिकित्सालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. त्याचबरोबर बागेचा ठेकेदार आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली.
बागेची देखभाल करणाऱ्यांनी माकडांना विष देऊन मारलं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी याप्रकरणी छोटे खान, इमरान, अफजल, अनवर, नदीम, मुबारक, नाझीम, मोहम्मद आणि इमामुद्दीन या आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल होते का, याचाही तपास सुरू आहे. Ajab Gajab : या लोकांना वृद्ध व्हायचं नाही, उचलणार मोठं पाऊल दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून एकाच वेळी 24 माकडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.