JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पोलीस बनायचं स्वप्न अधूरच राहिलं, धावता-धावता तरुणीचा जागीच कोसळून मृत्यू, अकोल्यातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

पोलीस बनायचं स्वप्न अधूरच राहिलं, धावता-धावता तरुणीचा जागीच कोसळून मृत्यू, अकोल्यातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

अकोल्यात एका तरुणीचा धावता-धावता मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीचा धावताना मैदानात कोसळून मृत्यू झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अकोला, 24 ऑगस्ट : पोलीस, सैनिक आणि इतर भरतींसाठी तरुण-तरुणी धावण्याची आणि इतर कवायत करताना आपल्याला नेहमी मैदानात आणि रस्त्यावर दिसत असतात. मात्र अशाचप्रकारे मैदानात धावण्याची कवायत करत असताना अकोल्यात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीचा धावताना मैदानात कोसळून मृत्यू झाला. संबंधित घटना ही सायंकाळी साडेचारच्या सुमारास अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियमवर घडली आहे. रोशनी अनिल वानखडे असं मृत पावलेल्या तरुणीचं नाव आहे. ती अकोला तालुक्यातील धोतर्डी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. रोशनी गेल्या काही दिवसांपासून बहिणीकडे अकोला शहरात राहत होती. ती गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करत होती. ( VIDEO : नाशिकमध्ये बड्या अधिकऱ्यावर तोंड लपविण्याची नामुष्की, ACB अधिकाऱ्यांनी रंगेहाथ आवळल्या मुसक्या ) रोशनी बुधवारी (24 ऑगस्ट) साडेचार वाजता धावण्याचा सराव करत असताना अचानक जमिनीवर कोसळली. यावेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी तिला शुद्धित आणण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. म्हणून तिला रुग्णालयात हलवण्यात आलं. पण रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रोशनीच्या मृत्यूमुळे मैदानावर सराव करणाऱ्यांना धक्काच बसला. रोशनीच्या वडीलांचं निधन झालं आहे. त्यामुळे पोलीस होऊन कुटुंबाला हातभार होईल, असं तिचं स्वप्न होतं. मात्र रोशनीच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार रोशनीला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. दरम्यान, गेल्यावर्षी रायगडला पोलीस भरतीमध्ये रोशनीने प्रयत्न केला होता. मात्र, तिथे तिला दोन गुणांनी अपयश आलं होतं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या