JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचाच घोटला गळा; पुण्यात लिव्ह इन पार्टनरनं प्रेयसीला दिला भयंकर मृत्यू

जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचाच घोटला गळा; पुण्यात लिव्ह इन पार्टनरनं प्रेयसीला दिला भयंकर मृत्यू

Murder in Pune: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी (Pimpri) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या (Girlfriend brutal murder) केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी, 08 मार्च: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरी (Pimpri) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या (Girlfriend’s brutal murder) केली आहे. आरोपी तरुण मागील काही महिन्यांपासून मृत तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहत होता. दरम्यान दोघांत खटके उडाल्यानंतर आरोपीनं तिचा गळा आवळून हत्या केली आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येची घटना उघडकीस येताच पोलिसांनी अवध्या काही तासात संशियत आरोपीच्या मुसक्या आवळल्या (Accused boyfriend arrested) आहेत. रितू भालेराव असं हत्या झालेल्या 20 वर्षीय तरुणीचं नाव आहे. मृत रितू ही मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती काही दिवसांपूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आली होती. तर श्याम ढेरे असं आरोपीचं नाव असून तोही पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. संबंधित दोघं मागील पाच ते सहा महिन्यांपासून पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. याठिकाणी दोघंही नवरा बायकोसारखं राहायचे. हेही वाचा- बहिणीला वाचवायला आला अन् दाजीचा ठरला बळी, बरगडीत चाकू घुसून झाला भयंकर मृत्यू मात्र आरोपी श्याम हा आधीपासूनच विवाहित होता. ही बाब समोर आल्यानंतर मृत रितू आणि श्याम यांच्यात खटके उडू लागले. त्यानंतर रितू श्यामकडे सतत पैशांची मागणी करू लागली. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीनं रितूचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी श्याम घटनास्थळावरून फरार झाला. हत्येची घटना उघडकीस येताच पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपी श्यामला अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. हेही वाचा- पुण्यात मध्यरात्री घडला थरार; डोक्यात दगड घालून जीवलग मित्राला जिवंत पेटवलं विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून पिंपरी परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी सांगवी परिसरात एका तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्याचबरोबर पिंपरीत भरचौकात एका व्यावसायिकाला गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतरही पिंपरी चिंचवड परिसरात हत्येचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणानं प्रेयसीची हत्या केल्यानं पिंपरी चिंचवड परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या