JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पुणे: कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांचा राडा; शिवीगाळ करत डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण

पुणे: कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांचा राडा; शिवीगाळ करत डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण

Crime in Pune: ‘आमच्या वडिलांवर तुम्ही व्यवस्थित उपचार करत नाहीत’, असा आरोप करत दोन युवकांनी एका डॉक्टरासह दोन परिचारकांना मारहाण (Beat doctor and nurse) केली आहे.

जाहिरात

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदापूर, 09 मे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका कोविड सेंटरमध्ये (Covid center) घुसून काही तरुणांनी तुफान राडा केला आहे. आमच्या वडिलांवर तुम्ही व्यवस्थित उपचार करत नाहीत, असा आरोप करत दोन तरुणांनी एका डॉक्टरासह दोन परिचारकांना मारहाण (Beat doctor and nurse) केली आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी पीडित महिला डॉक्टरने इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित दोन आरोपींची नावं सुनील चंद्रकांत रणखांबे आणि रवी चंद्रकांत रणखांबे असून दोघंही इंदापूरमधील पंचायत समिती कॉलनीतील रहिवासी आहेत. या दोघांनी शनिवारी (8 मे) रोजी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये घुसून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. यावेळी आरोपी युवकांनी कोणालाही न विचारता जबरदस्तीने कोविड सेंटरमध्ये प्रवेश केला आणि  ‘आमच्या वडिलांवर तुम्ही व्यवस्थित उपचार करत नाहीत’ असा आरोप करत डॉ. श्वेता कोडग यांचा हात पिरगळला आणि डाव्या गालावर चापट मारली. यावेळी फिर्यादी  डॉ. श्वेता कोडग कोविड रुग्णावर उपचार करत होत्या. यासोबतच रुग्णालयातील परिचारिका अंजली पवार आणि सोम्मया बागवान या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्याच थांबले नाहीत, तर त्यांनी शिवीगाळ केल्यानंतर पीडित डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या मारहाणीत अंजली पवार यांच्या गळ्याजवळ दुखापतही झाली आहे. याप्रकरणी डॉ. श्वेता कोडग यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. हे ही वाचा- नागपूरात जमावाकडून दोन डॉक्टर्सला मारहाण; डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत दैनिक पुढारी नं दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील चंद्रकांत रणखांबे आणि रवी चंद्रकांत रणखांबे यांचे वडील चंद्रकांत चन्नाप्पा रणखांबे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण मागील काही दिवसांपासून उपचार सुरू असताना देखील त्यांचे वडील बरे का होत नाहीत. हाच राग मनात धरून त्यांनी डॉक्टर आणि नर्संना दोष देत त्यांना मारहाण केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या