JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / बुस्टर डोससाठी कोरोना लसीच्या किंमतीत मोठी कपात; 'इतक्या' रुपयांना मिळणार लस

बुस्टर डोससाठी कोरोना लसीच्या किंमतीत मोठी कपात; 'इतक्या' रुपयांना मिळणार लस

कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटपासून (Coronavirus New Variant) बचाव व्हावा यासाठी 10 एप्रिलपासून देशातील 18+ लोकसंख्येच्या गटासाठी कोरोनाला लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील दोन मोठ्या कोरोना लस निर्मात्या कंपन्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (Covishield, Covaxin) या दोन्ही लसींच्या किंमतीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 एप्रिल : कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटपासून (Coronavirus New Variant) बचाव व्हावा यासाठी 10 एप्रिलपासून देशातील 18+ लोकसंख्येच्या गटासाठी कोरोनाला लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील दोन मोठ्या कोरोना लस निर्मात्या कंपन्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन  (Covishield, Covaxin) या दोन्ही लसींच्या किंमतीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट केली आहे. आता या दोन्ही लसी खासगी लसीकरण केंद्रावर फक्त 225 रुपयांमध्ये मिळणार आहे. या लसींच्या किंमतीबाबत दोन्ही कंपनीच्या प्रमुखांनी ट्विट करत माहिती दिली. कोविशिल्ड लसीची किंमत आधी 600 रुपये तर कोव्हॅक्सिनची किंमत 1200 रुपये प्रति डोस इतकी होती. या लसी आता 225 रुपयांना मिळणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे प्रमुख आदर पुनावाला यांनी याबाबत ट्विट करत म्हटले की, आम्हाला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, केंद्र सरकारसोबत चर्चा केल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने खासगी रुग्णालयांसाठी कोविशिल्ड लसीची किंमत 600 रुपयांवरून 225 रुपये प्रति डोस कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ही वाचा- BREAKING:18 वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार Corona Vaccine चा बुस्टर डोस, कुठे आणि कधीपासून मिळणार लस? 18+ लोकसंख्येच्या गटासाठी  Precaution Dose अर्थात बुस्टर डोस लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा केंद्राचे कौतुक करतो, असेही पुनावाला म्हणाले.

तर तेच दुसरीकडे भारत बायोटेकच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, सुचित्रा इल्ला यांनी देखील ट्विट करत म्हटले की, आम्ही,  18+ लोकसंख्येच्या गटासाठी Precaution Dose अर्थात बुस्टर डोस उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर, आम्ही खासगी रुग्णालयांसाठी COVAXIN ची किंमत 1200 रुपयांवरुन 225 रुपये प्रति डोस इतका करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, 18+ लोकसंख्येच्या गटासाठी (Coronavirus Vaccination Drive in India) देखील बुस्टर डोस दिला जाणार आहे. उद्या 10 एप्रिल 2022 पासून या वयोगटातील व्यक्तींना का Precaution Dose अर्थात बुस्टर डोस (Precaution Dose to be now available to 18+ population) घेता येणार आहे. यासाठी सर्वच खासगी लसीकरण केद्रांवर बुस्टर डोस उपलब्ध असणार आहे. तर तेच पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी सरकारी लसीकरण केंद्रांवर विनाशुल्क लसीकरण सुरू राहील. याव्यतिरिक्त सरकारी लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी विनामूल्य लसीकरण सुरू राहील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या