JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / शास्त्रज्ञांकडून कोरोनाच्या रहस्याची उकल;10-20 वर्षांआधीच आले होते 2 व्हायरस

शास्त्रज्ञांकडून कोरोनाच्या रहस्याची उकल;10-20 वर्षांआधीच आले होते 2 व्हायरस

जवळपास अडीच वर्षं झाली आहेत, तरीही कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. उलट…

जाहिरात

राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. अशातच राज्यात बी.ए. 4 चे 3 आणि बी.ए. 5 व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 एप्रिल : कोरोना विषाणू (Corona Virus) माणसाच्या रोगप्रतिकारशक्तीला (Immune System) कसं हरवत आहे, हे आतापर्यंत शास्त्रज्ञांसाठी एक रहस्यच होतं. जवळपास अडीच वर्षं झाली आहेत, तरीही कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. उलटपक्षी तो वेगवेगळी रूपं घेऊन प्रत्येक लशीला (Corona Vaccine) वर मात करून जगभरात अनेक लाटा घेऊन येत आहे. परंतु आता शास्त्रज्ञांनी या रहस्याची काही प्रमाणात उकल केली आहे. दहा ते वीस वर्षांपूर्वी आढळलेल्या दोन विषाणूंनी कोरोनासाठी पार्श्वभूमी तयार केली होती, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या निष्कर्षानंतर आता कोरोनावर कायमचा उपचार शोधला जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे. आयर्लंडमधल्या डबलिन इथं असलेल्या ट्रिनिटी बायोमेडिकल सायन्सेस इन्स्टिट्यूटचे (TBSI) डॉक्टर नायजेल स्टिवेन्सन यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी यावर संशोधन केलं आहे. मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) आणि सीव्हियर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) या विषाणूंनी मानवाच्या रोगप्रतिकारशक्तीला गंभीर नुकसान पोहोचवलं आहे, असं त्यांना आढळलं आहे. यापैकी सार्सचा विषाणू 2002 मध्ये, तर मर्सचा विषाणू 2012 मध्ये आढळला होता. या दोन्ही विषाणूंचा चेहरामोहरा बहुतांश प्रमाणात कोरोनासारखाच होता. या विषाणूंचा वेगानं प्रसार झाला. शिवाय मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यूही झाला. एवढंच नाही, तर ज्या व्यक्ती वाचल्या, त्यांच्या शरीरात जीवघेण्या विषाणूशी लढणारं प्रोटिन (Antiviral Proteins) मानवी पेशींपर्यंत पोहोचू शकणार नाही, असे अडथळे या विषाणूंनी निर्माण केले. अशा प्रकारे जगभरात कोरोनाचा प्रसार होण्यासाठी पार्श्वभूमी तयार झाली होती. सार्स आणि मर्समुळे असं झालं नुकसान शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, मानवी पेशींमध्ये विषाणू आणि इतर रोगांशी लढण्यासाठी माणसाला ताकद देणारे सर्व प्रोटीन्स आणि इतर घटक असतात. या रोगप्रतिकारक घटकांची संख्या जेव्हा निश्चित मर्यादेपेक्षा कमी होते, तेव्हा माणसं आजारी पडतात. त्यानंतर आजारी व्यक्तीला बाहेरून अशी प्रोटिन्स आणि प्रतिरोधक घटकांचा पुरवठा केला जातो. (हे वाचा -  Russia-Ukraine युद्धामुळे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर भयंकर परिणाम? ) औषधं, लस आदींच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात जाऊन पेशींमध्ये प्रोटीन्सची संख्या वाढवली जाते. हे घटक विषाणूंशी लढतात. मानवी शरीरात विषाणूशी लढा देणाऱ्या प्रोटीन्सना इंटरफेरॉन (Interferon) असं म्हणतात. परंतु सार्स आणि मर्स या विषाणूंनी इंटरफेरॉनचा मार्ग रोखण्यासाठी माणसाच्या शरीरात प्रोटीन्स सोडले. ते निष्क्रिय केले. कमकुवत केले. याचाच गैरफायदा कोरोना विषाणू घेत आहे. आता कोरोनावर उपचारांची आशा डॉ. नायजेल याबाबत सांगतात, की माणसांना कोरोना विषाणूची पुन्हा पुन्हा का बाधा होत आहे, याच्या कारणाच्या आपण जवळपास पोहोचलो आहोत. तेव्हा उपचार होण्याची आशाही केली जाऊ शकते. सार्स आणि मर्सप्रमाणेच इंटरफेरॉनचा मार्ग रोखणारे प्रोटीन्स कोरोना विषाणूमध्येसुद्धा आहेत. ते निष्क्रिय आणि कमकुवत करतात. आता आम्हाला इंटरफेरॉनचा मार्ग रोखणाऱ्या कोरोनाच्या घातक प्रोटीन्सवर हल्ला करणारं औषध विकसित करायचं आहे. असं औषध तयार झालं, तर कोरोनाशी दोन हात करण्यास निश्चितच यश येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या