JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Panacea Biotec : आणखी एक भारतीय संस्था Corona वरची लस बनवणार; अमेरिकन कंपनीशी झाला करार

Panacea Biotec : आणखी एक भारतीय संस्था Corona वरची लस बनवणार; अमेरिकन कंपनीशी झाला करार

Panacea Biotec या भारतीय कंपनीने Coronavirus वरची लस (Covid-19 vaccine ) शोधण्यासाठी अमेरिकेतल्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जून : Panacea Biotec या भारतीय कंपनीने Coronavirus वरची लस (Covid-19 vaccine ) शोधण्यासाठी अमेरिकेतल्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. Covid-19 वर लस शोधण्याच्या प्रयत्ना असलेली पॅनेशिया बायोटेक ही भारतातली पाचवी कंपनी ठरली आहे. या कंपनीने अमेरिकेतल्या Refana Inc या कंपनीबरोबर करार केला आहे. पॅनेशियाने तयार केलेल्या लशीची प्राण्यांवर चाचणी करण्यास याअगोदरच हिरवा कंदील मिळाला होता. पॅनेशिया बायोटेकने Covid-19 वरची लस निर्माण करण्यासाठी अगोदरपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. आता अमेरिकी कंपनीशी करार झाल्याने लसनिर्मितीच्या प्रक्रियेला वेग येईल, असं पॅनेशियातर्फे सांगण्यात आलं. ही लस सध्या अॅनिमल ट्रायलच्या टप्प्यावर आहे. आतापर्यंतचा प्रवास यशस्वी असल्याचा कंपनीचा दावा आहे. या दोन्ही कंपन्यांनी मिळून 50 कोटी डोस निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीची लस बाजारात येईल, अशा अंदाज आहे. किमान 4 कोटी डोस या वेळी उपलब्ध होतील, असा अंदाज कंनीने वर्तवला आहे. या दोन्ही कंपन्यांचं एकत्रित उत्पादन आयर्लंडमध्ये उभारलेल्या लॅबमध्ये होईल. जॉन्सन अँड जॉन्सनची लस अंतिम टप्प्यात औषधं उत्पादन क्षेत्रातली दिग्गज अमेरिकन कंपनी असणाऱ्या Johnson & Johnson ने कोरोनावर औषध सापडल्याचा दावा केला आहे. त्यांनी तयार केलेल्या लसीचं अंतिम टप्प्यातलं परीक्षण सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. या औषधाच्या मानवी चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येतील, असा दावा कंपनीने केला आहे. त्यासाठी कंपनीने अमेरिकन सरकारकडे परवानगीही मागितली आहे. त्याचबरोबर कंपनीने अमेरिकन सरकारसोबत एक करार केला असून औषध सिद्ध झालं तर कंपनी तब्बल 1 लाख बिलियन डोजेस तयार करणार आहे. औषधं उत्पादन क्षेत्रातली दिग्गज अमेरिकन कंपनी असणाऱ्या Johnson & Johnson ने कोरोनावर औषध सापडल्याचा दावा केलाय. या औषधाच्या मानवी चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येतील असा दावा कंपनीने केला आहे. त्यासाठी कंपनीने अमेरिकन सरकारकडे परवानगीही मागितली आहे. त्याचबरोबर कंपनीने अमेरिकन सरकारसोबत एक करार केला असून औषध सिद्ध झालं तर कंपनी तब्बल 1 लाख बिलियन डोजेस तयार करणार आहे. संकलन- अरुंधती अन्य बातम्या बाबा रामदेव यांनी सांगितला Corona वरचा आयुर्वेदिक उपचार, 2 रामबाण औषधींचा शोध 5 दिवसांच्या मुलाच्या हार्ट सर्जरीसाठी पसरले हात, बापावर ओढावली दुर्दैवी वेळ बापरे! कोरोना व्हायरसमुळे जगात होऊ शकतो 10 कोटी लोकांचा मृत्यू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या