5 दिवसांच्या मुलाच्या हार्ट सर्जरीसाठी पसरले हात, गरीब बापावर ओढावली दुर्दैवी वेळ

5 दिवसांच्या मुलाच्या हार्ट सर्जरीसाठी पसरले हात, गरीब बापावर ओढावली दुर्दैवी वेळ

मुलाच्या सर्जरीसाठी होते नव्हते ते सर्व पैसे खर्च केल्याने आता त्याचे वडील आता आर्थिक विवंचनेत अडकले आहेत.

  • Share this:

मुंबई, 11 जून : मुलगा जन्माला येताच त्याला ‘PAIVS’ हा ह्रदयाशी संबंधित आजार असल्याचं कळालं. या आजारामुळे रक्त ह्रदयापर्यंत पोहोचू शकतं नव्हतं. यामुळे तात्काळ शस्त्रक्रिया गरजेचं होतं. मुंबईतील डॉक्टरांनी मोठे प्रयत्न करत या मुलाचा जीव वाचवला आहे. मात्र मुलाच्या सर्जरीसाठी होते नव्हते ते सर्व पैसे खर्च केल्याने आता त्याचे वडील आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

अब्दुल अन्सारी या पेशाने पेंटर असणाऱ्या व्यक्तीच्या घरची परिस्थिती खूप हालाखीची आहे. मात्र मुलाच्या जीवाला धोका होऊ नये, म्हणून त्याच्या हार्ट सर्जरीसाठी अब्दुल यांनी घरातील सर्व वस्तू विकल्या आणि पैशांची जमवाजमव केली. हार्ट सर्जरीनंतर त्यांचा मुलगा आता सुखरूप आहे. पण आधीच गरिबीत दिवस काढणाऱ्या अन्सारी कुटुंबासमोर आता आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी सरकारडे मदतीची मागणी केली आहे.

दरम्यान, सध्याच्या काळातील उपचारासंबंधित साधनांचा विचार करता जन्मताच ह्रदयाशी संबंधित गंभीर आजार असणारी 75 टक्के मुले एक वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. तर काही मुलं त्यानंतरही सामान्य जीवन जगू शकतात. जर आजाराचं निदान लवकर होऊन त्या रुग्णावर लवकर उपचार झाले तर तंदुरुस्त होण्याची शक्यता वाढते.

आकड्यांनुसार ह्रदयाशी संबंधित आजारांमुळे जागतिक स्तरावर प्रत्येक 1000 मुलांपैकी 8-10 जणांचा मृत्यू होतो. तर भारताच हेच प्रमाण 1000 मुलांपैकी 6-8 मृत्यू एवढं आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 11, 2020, 5:18 PM IST

ताज्या बातम्या