JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / What an Idea! ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी आता Parlours, या जिल्हात रुग्णांसाठी खास सुविधा

What an Idea! ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी आता Parlours, या जिल्हात रुग्णांसाठी खास सुविधा

कोरोनामुळे देशात इतकी गंभीर परिस्थिती आणली आहे, की अनेकांना ऑक्सिजनसाठी अक्षरशः वणवण करावी लागते आहे. ही वणवण कमी करण्यासाठी सध्या विविध पातळ्यांवरून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केरळमध्ये ऑक्सिजन पार्लरची अनोखी कल्पना राबवली जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोट्टायम, 29 एप्रिल: कोरोनामुळे देशात (Coronavirus in India) इतकी गंभीर परिस्थिती आणली आहे, की अनेकांना ऑक्सिजनसाठी अक्षरशः वणवण करावी लागते आहे. ही वणवण कमी करण्यासाठी सध्या विविध पातळ्यांवरून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केरळमध्ये ऑक्सिजन पार्लरची अनोखी कल्पना राबवली जात आहे. कोट्टायम (Kottayam) जिल्हा प्रशासन संपूर्ण जिल्ह्यात ऑक्सिजन पार्लर्स उघडणार असून, मानरकद (Manarcad) इथल्या सेंट मेरी चर्च ऑडिटोरियममधल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये (Covid Care Center) अशा एका ऑक्सिजन पार्लरचं (Oxygen Parlour) उद्घाटन 28 एप्रिलला झालं. अशा प्रकारचा हा केरळ (Kerala) राज्यामधला पहिलाच उपक्रम आहे. दी न्यू इंडियन एक्स्प्रेस ने याबद्दल वृत्त दिलं आहे. कोट्टायम जिल्ह्यातही कोव्हिड रुग्णांची संख्या गगनाला भिडली आहे. त्यात गृह विलगीकरणात अर्थात होम आयसोलेटेड (Home Isolation) असलेल्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. हे रुग्ण रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी (Blood Oxygen Level) तपासू शकतात आणि त्यांना गरज असेल, तर ऑक्सिजन पार्लरमधून त्यांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हाधिकारी एम. अंजना यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शिल्पा देविया यांच्या उपस्थितीत मानरकद इथल्या ऑक्सिजन पार्लरचं उद्घाटन केलं. ज्या भागात सर्वाधिक रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, अशी ठिकाणं पाहून त्या भागांमध्ये ऑक्सिजन पार्लर्स उभारण्यात येत असल्याचं एम. अंजना यांनी सांगितलं. ऑक्सिजन पातळीत अचानक बदल झाला, तर उपचारांमध्ये होणारा उशीर टाळण्यास यामुळे मदत होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. (हे वाचा- कामगार संघटनांची मोफत लसीकरणाची मागणी, 1 मे रोजी आंदोलनाचा इशारा ) गृह विलगीकरणात असलेले कोव्हिड रुग्ण आवश्यक तो प्रोटोकॉल पाळून ऑक्सिजन पार्लरमध्ये येऊन ऑक्सिजन पातळी तपासून गरज असल्यास ऑक्सिजन मिळवू शकतात. या पार्लरमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन (Oxygen Concentrator) असून, ते दिवसाचे 24 तास ऑक्सिजन पुरवतं. प्रति मिनिटाला पाच लीटर इतका ऑक्सिजन हे मशीन पुरवू शकतं. हे मशीन आजूबाजूच्या वातावरणातला ऑक्सिजन घेऊन तो 93 टक्के शुद्ध स्वरूपात रुग्णाला देतं. त्यामुळे साठा संपल्याचा प्रश्नच येण्याची शक्यता नाही. एका युनिटची किंमत सुमारे 50 हजार रुपये आहे. पार्लरमध्ये आलेल्या रुग्णांनी दोन मिनिटं विश्रांती घेतल्यावर पल्स ऑक्सिमीटरच्या (Pulse Oxymeter) सहाय्याने त्यांच्या रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. ती 94 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तरच रुग्णांना या मशीनचा वापर करू दिला जातो. तिथल्या किऑस्कमध्ये असलेला ऑक्सिजन मास्क सॅनिटाइझ करून रुग्णांनी वापरायचा असतो. नाक आणि तोंड झाकेल अशा पद्धतीने मास्क लावून मग मशीन सुरू करायचं असतं. (हे वाचा- ‘मुंबईकरांनो डबल मास्क लावा, अन्यथा’; कतरिना कैफनं शेअर केली BMCची पोस्ट ) 10 मिनिटं ऑक्सिजन घेतल्यानंतर पुन्हा रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. ती 94 टक्क्यांच्या वर गेली असेल, तर रुग्णाला घरी पाठवलं जातं. पातळी 94 टक्क्यांच्या वर गेली नसेल, तर रुग्ण आणखी एकदा मशीन वापरू शकतो. घरी राहत असलेल्या रुग्णांसाठी अशा प्रकारची केरळ राज्यातली ही पहिलीच सुविधा आहे. जिल्ह्यातल्या सर्व कोविड फर्स्ट लाइन ट्रीटमेंट सेंटर्सवर, तसंच अन्य ठिकाणी ही ऑक्सिजन पार्लर्स उघडली जाणार आहेत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. या कामी स्वयंसेवी संस्था, नागरी संघटना आणि दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे, जेणेकरून अधिकाधिक मशीन्स उपलब्ध होऊ शकतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या