JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Maharashtra Corona News : धोका वाढला! राज्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढच, मुंबई, पुण्यात आरोग्य विभाग सतर्क

Maharashtra Corona News : धोका वाढला! राज्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढच, मुंबई, पुण्यात आरोग्य विभाग सतर्क

राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य आरोग्य विभागही सतर्क झाले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जुलै : राज्यात कोरोनाचा विळखा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दरम्यान राज्यात ओमिक्रॉनच्या सब वेरिंअट प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 उप-प्रकारांच्या प्रकरणांची संख्या महाराष्ट्रात 160 वर पोहोचली आहे. यामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य आरोग्य विभागही सतर्क झाले आहे. (Maharashtra Corona News)

महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या सब वेरिंअट प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने काळजी वाढली आहे. ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 उप-प्रकारांच्या प्रकरणांची संख्या महाराष्ट्रात 160 वर पोहोचली आहे. पुण्यात 93, मुंबईत 51, ठाण्यात 5, नागपूरमध्ये 4, पालघरमध्ये 4 आणि रायगडमध्ये 3 रुग्ण आढळले आहेत.

हे ही वाचा :  तो पुन्हा कोसळधार, मुसळधार, संततधार, मेघगर्जनेसह येणार, मुंबई, पुणे, विदर्भात alert

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात BA.5 संसर्गाची नवीन प्रकरणे नोंदवली गेली. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन जणांना ओमिक्रॉनचे BA.5 उप-प्रकार संसर्ग झाला आहे. दोन्ही रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आले. दुबईहून परतत असताना पुणे विमानतळावर नियमित तपासणीत दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आरोग्य विभागाने सांगितले की, दोन्ही बाधित आयसोलेशनमध्ये पूर्णपणे बरे झाले आहेत. बाधित दोघेही महाराष्ट्राबाहेरील असून, सध्या ते पुण्याच्या ग्रामीण भागात राहत आहेत.

जाहिरात

हे ही वाचा :  शिंदे सरकारचा मोठा निर्णय: राज्यातील ही 2 महत्त्वाची प्रकरणं CBI कडे वर्ग करण्याचे निर्देश

महाराष्ट्रात मागच्या 24 तासांत 2515 रुग्ण आणि 6 मृत्यू यांची नोंद झाली तर 2449 जण बरे झाले. राज्यात 145779 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या 80 लाख 29 हजार 910 कोरोना रुग्णांपैकी 78 लाख 67 हजार 280 बरे झाले. राज्यात कोरोनामुळे 1 लाख 48 हजार 051 जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या 8 कोटी 28 लाख 34 हजार 957 कोरोना चाचण्यांपैकी 80 लाख 29 हजार 910 पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.84 टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट 9.69 टक्के, रिकव्हरी रेट 97.97 टक्के आहे.

जाहिरात

राज्यात स्वाईन फ्लूचाही धोका

१ जानेवारी ते २१ जुलै २०२२ या कालावधीत आढळलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाने जारी केली. त्यानुसार राज्यात १४२ रुग्ण स्वाईन फ्ल्यूने ग्रस्त आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४३ रुग्ण मुंबईत असून त्यापाठोपाठ पुणे २३ (मृत्यू २), पालघर २२, नाशिक १७, नागपूर १४, कोल्हापूर १४ (मृत्यू ३), ठाणे ७ (मृत्यू २), कल्याण-डोंबिवलीतील दोन रुग्णांची नोंद झाली आहे. स्वाईन फ्ल्यूच्या अनुषंगाने योग्य सर्वेक्षण, प्रतिबंध व नियंत्रण उपायोजना अमलात आणल्या जात असल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या